दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 30, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. २७ यांची समाजांत स्थापना केल्यावर किंवा ती करीत असतां त्यास पाठिंबा देऊन त्यांचें रक्षण करणारी राज्यसंस्थाहि त्यांनीं शिवाजीमहाराजांच्या हस्तें निर्माण केली. ही राज्यसंस्था कशी निर्माण केली याचेंहि खुलासेवार विवेचन त्यांनीं आपल्या दासबोधांत केलें आहे. तें चांगलें मनन करण्याजोगें आहे. सावधपण अथवा वर्तनाचें लक्षण हें समर्थांच्या शिकवणीचें तिसरें अंग आहे. यांत सर्व प्रकारची चतुरस्त्रता-दक्षता-उर्फ व्यवहारज्ञान याचा समावेश होतो. याचा उपयोग प्रपंच व परमार्थ ह्या दोहींकडे सारखाच असतो. प्रपंच- परमार्थाविषयीं अव्यग्रता असणें, काळप्रसंग जाणणें, सर्व कांहीं उपाधी करीत असूनहि उदासीन असणें-त्यांत लिप्त न होणें आणि प्राणिमात्रांविषयीं समबुद्धि बाळगणें इत्यादि ह्या तिसऱ्या अंगाचीं लक्षणें आहेत. परिश्रमण, चाळणा, विवेक, कष्ट, देहाच्या क्षणभंगुरतेविषयीं तीव्र जाणीव, कीर्तीची चाड, वैराग्य, निस्पृहता, मृदुवचन, क्षमा, शांति, सहिष्णुता, परोपकार व उत्कटता ह्या ११ उपायांच्या द्वारें उपरिनिर्दिष्ट अंगत्रयांनीं युक्त अशा आपल्या सांप्रदायाचें कार्य हातीं घेण्याची पात्रता संपादन करावी असें समर्थांचें सांगणें आहे. ही पात्रता संपादन करण्याचे वेळींहि वरील 'वर्तनाचें लक्षणा'चा फार उपयोग असतो, तो कसा याचें खुलासेवार स्पष्टीकरण दासबोधांत जागोजाग केलेलें आहे. नमुन्याकरितां कांहीं उतारे देतों:— (१) आपणास जें जें अनुकूल । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ (१९-६-२७) (२) दुसऱ्याचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ॥ (३) दुसऱ्याचे मनोगतें जावें । मिळोनिया ॥ (१५-६-१७) (४) राहटांहों शोध घ्यावा । परांतराचा (१५-१-४) (५) मृत्याभयेण पळों जातां । तरी मृत्यु सोडिना सर्वथा । मृत्यास न ये चुकावितां । कांहीं केल्या ॥ (३-९-१८) (६) ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें । जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ (३-९-४४) (७) कीर्ति करून नाहीं मेले । ते उगेच आले आणि गेले । शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥