दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 29, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२६ उपोद्घात. साक्षेपें साक्षपु वाढे । पुरती मनकामना ॥ २ ॥ कष्टतां सौख्य मानावें । कष्टीं फळचि पाविजे । आळसें सुख वाटे तें । दुःखब्रह्मांड भोगवी ॥ ३ ॥ केल्यानें होत आहे रे । आधीं केलेंचि पाहिजे । येत्न तो देव जाणावा । अंतरीं धरितां बरें ॥ ४ ॥ —स्फुट काव्यें. (२) लहान थोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं । म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ( १२-९-८ ) —दासबोध. (३) घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड । तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ ( १२-९-२९ ) (४) व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी संदेव होती । देखत देखतां ॥ ( १५-३-७ ) (५) कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ( १८-७-३ ) (६) येहलोक अथवा परलोक । दोहींकडे सारिखाचि विवेक ॥ ( १८-७-६ ) ऐहिक अथवा पारमार्थिक यांपैकीं कोणतेंहि कल्याण साधावयाचें असेल तर मनुष्यानें प्रयत्नरत झालें पाहिजे, असें समर्थांनीं निक्षून सांगितलें आहे; इतकेंच नव्हे, तर प्रयत्न हाच देव-ईश्वर-असेंहि ते म्हणतात ! ऐहिक कल्याण साधणारांस तर यत्न पाहिजेच, परंतु परमार्थाचा लाभ करून घेणाऱ्यानेहि दुश्चितपणा ऊर्फ आलस्य व करंटपण सोडून उपासनेचा पडिभर वाढवावा असें त्यांचें सांगणें आहे. ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ हा उपदेश अशा लोकांनाच अनुलक्षून केला आहे. याप्रमाणें चातुर्वर्ण्य व भक्तिमार्ग यांची सुधारणा करून धर्म व नीति