दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
२६ उपोद्घात. साक्षेपें साक्षपु वाढे । पुरती मनकामना ॥ २ ॥ कष्टतां सौख्य मानावें । कष्टीं फळचि पाविजे । आळसें सुख वाटे तें । दुःखब्रह्मांड भोगवी ॥ ३ ॥ केल्यानें होत आहे रे । आधीं केलेंचि पाहिजे । येत्न तो देव जाणावा । अंतरीं धरितां बरें ॥ ४ ॥ —स्फुट काव्यें. (२) लहान थोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं । म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ( १२-९-८ ) —दासबोध. (३) घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड । तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ ( १२-९-२९ ) (४) व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी संदेव होती । देखत देखतां ॥ ( १५-३-७ ) (५) कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ( १८-७-३ ) (६) येहलोक अथवा परलोक । दोहींकडे सारिखाचि विवेक ॥ ( १८-७-६ ) ऐहिक अथवा पारमार्थिक यांपैकीं कोणतेंहि कल्याण साधावयाचें असेल तर मनुष्यानें प्रयत्नरत झालें पाहिजे, असें समर्थांनीं निक्षून सांगितलें आहे; इतकेंच नव्हे, तर प्रयत्न हाच देव-ईश्वर-असेंहि ते म्हणतात ! ऐहिक कल्याण साधणारांस तर यत्न पाहिजेच, परंतु परमार्थाचा लाभ करून घेणाऱ्यानेहि दुश्चितपणा ऊर्फ आलस्य व करंटपण सोडून उपासनेचा पडिभर वाढवावा असें त्यांचें सांगणें आहे. ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ हा उपदेश अशा लोकांनाच अनुलक्षून केला आहे. याप्रमाणें चातुर्वर्ण्य व भक्तिमार्ग यांची सुधारणा करून धर्म व नीति
श्रीसमर्थांची शिकवण. २७ यांची समाजांत स्थापना केल्यावर किंवा ती करीत असतां त्यास पाठिंबा देऊन त्यांचें रक्षण करणारी राज्यसंस्थाहि त्यांनीं शिवाजीमहाराजांच्या हस्तें निर्माण केली. ही राज्यसंस्था कशी निर्माण केली याचेंहि खुलासेवार विवेचन त्यांनीं आपल्या दासबोधांत केलें आहे. तें चांगलें मनन करण्याजोगें आहे. सावधपण अथवा वर्तनाचें लक्षण हें समर्थांच्या शिकवणीचें तिसरें अंग आहे. यांत सर्व प्रकारची चतुरस्त्रता-दक्षता-उर्फ व्यवहारज्ञान याचा समावेश होतो. याचा उपयोग प्रपंच व परमार्थ ह्या दोहींकडे सारखाच असतो. प्रपंच- परमार्थाविषयीं अव्यग्रता असणें, काळप्रसंग जाणणें, सर्व कांहीं उपाधी करीत असूनहि उदासीन असणें-त्यांत लिप्त न होणें आणि प्राणिमात्रांविषयीं समबुद्धि बाळगणें इत्यादि ह्या तिसऱ्या अंगाचीं लक्षणें आहेत. परिश्रमण, चाळणा, विवेक, कष्ट, देहाच्या क्षणभंगुरतेविषयीं तीव्र जाणीव, कीर्तीची चाड, वैराग्य, निस्पृहता, मृदुवचन, क्षमा, शांति, सहिष्णुता, परोपकार व उत्कटता ह्या ११ उपायांच्या द्वारें उपरिनिर्दिष्ट अंगत्रयांनीं युक्त अशा आपल्या सांप्रदायाचें कार्य हातीं घेण्याची पात्रता संपादन करावी असें समर्थांचें सांगणें आहे. ही पात्रता संपादन करण्याचे वेळींहि वरील 'वर्तनाचें लक्षणा'चा फार उपयोग असतो, तो कसा याचें खुलासेवार स्पष्टीकरण दासबोधांत जागोजाग केलेलें आहे. नमुन्याकरितां कांहीं उतारे देतों:— (१) आपणास जें जें अनुकूल । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ (१९-६-२७) (२) दुसऱ्याचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ॥ (३) दुसऱ्याचे मनोगतें जावें । मिळोनिया ॥ (१५-६-१७) (४) राहटांहों शोध घ्यावा । परांतराचा (१५-१-४) (५) मृत्याभयेण पळों जातां । तरी मृत्यु सोडिना सर्वथा । मृत्यास न ये चुकावितां । कांहीं केल्या ॥ (३-९-१८) (६) ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें । जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ (३-९-४४) (७) कीर्ति करून नाहीं मेले । ते उगेच आले आणि गेले । शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥
२८ उपोद्घात. ( ८ ) झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे कीं फुकाची ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपाडावें । ( ११-५-९ ) ( १० ) उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेंच टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं । ( -१४-१ ) ( ११ ) नाना जनांचें हृदय । मृदु शब्दें उकलावें ॥ ( १२ ) वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये । तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ ( १३-१०-२६ ) ( १३ ) बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ ( १४ ) शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों नेदावें । कोणीयेकाचें ॥ ( १५ ) उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठायीं ठायीं ॥ कांहींएक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ हे उतारे अगदीं निवडक व त्रोटक आहेत. त्यांत बीजरूपानें जीं तत्त्वें सांगितलीं आहेत, त्यांचा विस्तार पहावयाचा असल्यास दासबोध ग्रंथ समग्र लक्षपूर्वक वाचावा. दासबोधाखेरीज समर्थांचे काव्यबद्ध असे आणखी कित्येक प्रबंध आहेत. त्यांपैकीं कांहीं प्रकाशित व कांहीं अप्रकाशित आहेत. अप्रकाशित प्रकरणांपैकीं बरीच प्रकरणें धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभेस उपलब्ध झालीं आहेत व त्यां- तील कांहीं तिनें एका स्वतंत्र खंडाच्या रूपानें प्रसिद्धहि केलीं आहेत. हीं सर्व प्रकरणें समर्थांनीं निरनिराळ्या प्रसंगीं लिहिलेलीं आहेत. त्यांतील मतलब सामा- न्यतः दासबोधांतील प्रमेयास पोषक आहे. किंबहुना, ह्या प्रमेयांचें विशेष व खुलासेवार स्पष्टीकरणच त्यांत आहे असें म्हटलें तरी चालेल. ह्या स्फुट- काव्याप्रमाणें समर्थांनीं एक रामायणहि रचिलें आहे. परंतु हें रामायण साग्र नाहीं. सीतेची बंधमुक्तता करून रावणाचा वध करण्याचा जो भाग मूळ रामायणांत आहे तोच समर्थांनीं आपल्या रामायणाचा मुख्य विषय बनविला
श्रीसमर्थांची शिकवण. २९
आहे. ही निवड करण्यांतहि त्यांचें औचित्य व राष्ट्रीय दृष्टि दिसून येते. तत्का- लीन महाराष्ट्राचें बंधन दूर करणें हें समर्थांचें उद्दिष्ट कार्य होतें. अर्थात् ह्या कार्यास पोषक असा जो सीताबंधविमोचनाचा प्रसंग तेवढाच निवडून घेऊन तो आपल्या भेदक वक्तृत्वानें तत्कालीन महाराष्ट्राच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न त्यांनीं करावा, हें त्यांच्या विचक्षणतेस व धूर्ततेस साजेसेंच आहे. ह्या एकाच गोष्टीवरून समर्थांची दृष्टि इतर संतांहून कशी निराळी म्हणजे राष्ट्रीय अशी होती हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. त्यांची इतर काव्यप्रकरणेंहि बहुधा याच दृष्टीनें लिहिलेलीं आहेत. त्यामुळे दासबोधाप्रमाणेंच तींहि धगधगीत व चैतन्यरूप असून आजकालच्या वाचकवर्गांचेंहि चित्ताकर्षण करूं शकतात. ह्या प्रकरणांतहि राष्ट्रोद्धाराला अवश्यक अशा गुणांचें वर्णन ठिकठिकाणीं फार मोहक रीतीनें केलेलें आहे. प्रत्यंतराकरितां कांहीं उदाहरणें देतों:— (१) भाग्यासी काय उणें रे । येत्नावांचूनि राहिलें । येत्न तो करावा कैसा । हेंचि आधीं कळेचिना ॥ १ ॥ मुख्य येत्न विचाराचा । त्यावरी बोलणें बरें । चालणें सत्य नेमाचें । नीति न्याय चुकों नये ॥ २ ॥ गलबला बुद्धि नासीतो । नाना निश्चय सांगती । ऐकावें कोणकोणाचें । बोलताहे बहुचकी ॥ ३ ॥ सांगोंचि जाणती सर्व । कर्तां कोणी दिसेचिना । जाणते नेणते सांगो । स्वभाव लागला जनीं ॥ ४ ॥ * * * * करंटे मिळाले सर्वें । जो तो बुधिच सांगतो । सांगावें तें आपणाला । आपणु करितां बळें ॥ ७ ॥ ( स्फु. प्रक. ) (२) धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका । काळ देखोनि वर्तावें । सांडावें भय पोटिचें ॥ १ ॥ धरावा धीर तो मोठा । विचारें पाहतां बरें । अधीर माणसें खोटीं । काम कांहीं कळेचिना ॥ २ ॥ * * * * प्रसंगीं चळचळा कांपे । तो प्राणी आत्मघातकी ॥५॥ ( स्फु. प्रक.)
३० उपोद्घात. ( ३ ) राम उपासना माझी । त्रयलोक्य सुख पावलें । सोडिले देव इंद्रादि । तोडिलीं बंधनें बळें ॥ कीर्तीसी तुळणा नाहीं । प्रतापे आगळा बहु । न्याय नेमस्त हे लीळा । न भूतो न भविष्यति ॥ उन्मत्त रावणें येणें । त्रैलोक्य पीडिलें बळें ॥ देव ते घातले बंदी । कैपक्षी राम पावला ॥ श्रीरामांनीं सीताशुद्धि करून शक्ति ऊर्फ आदिमाया-जगज्जननी-हिची आराधना करून तिच्या वरप्रसादानें रावणाचा पराभव केला असें सांगून पुढें समर्थ म्हणतात:— ( ४ ) जगजनि रामवरदानी । तयीपासुनि बोलिजे । उदंड ऐकिलें होतें । प्रतीत मजला नसे ॥ प्रतापगिरीचें ठायीं । आदिशक्ती विराजते । कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं ॥ तुळजापुरीची माता । प्रतापेंचि प्रगटली ॥ आदिशक्ती माहंमाया । कुळीची कुळस्वामिनी ॥ कुळची पाळिलें आम्हां । रक्षिलें बहुतां परीं । तिची ते वैष्णवी माया । तारिते मारिते जनीं ॥ शक्तीनें पावती सुखें । शक्ती नसतां विटंबना । शक्तीनें नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥ कोण पुसे अशक्ताळा । रोगीसे बराडी दिसे । कळा नाहीं कांति नाहीं । युक्ति बुधी दुरावली ॥ साजिरी शक्ती तों काया । काया मायाचि वाढवी । शक्ती तों सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥ सार संसार शक्तीनें । शक्तीनें शक्ति भोगिजे । शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दारिद्रता ॥ शक्तीनें मिळती राज्यें । युक्तीनें यत्न होतसे । शक्ती युक्ती जये ठायीं । तेथें श्रीमंत धांवती ॥ युक्ती ते जाड कळा । विश्र्वकीसी तुळणा नसे ।
श्रीसमर्थांची शिकवण. ३१ अचूक चुकेना कोठें । त्याचीं राज्यें समस्तही ॥ युक्तीनें चालती सेना । युक्तीनें युक्ति वाढवी । संकटीं आपणा रक्षी । रक्षी सेना परोपरीं ॥ × × × × चोरटीं होरेंटीं तुंदें² । नासकें लांच इच्छिती । लाँढीचे दुरी घालावे । मारावे राजकारणें ॥ लोकांसी राखणें राजी । तें राज्य प्रबळे बळें । बंद बेबंद जाणावे । तांबे ताबे परोपरीं ॥ खेंळ खोचरें काढावे । तंदुळासारिखे खडे । खरें तें आदरें घ्यावें । खोटें सर्वत्र ताकिती ॥ कांहींएक परिक्षावें । शोधावें बहुतांपरीं । नेटकें कार्य साधावें । रोधावें कुटिला जना ॥ असो हें बोलणें जालें । युक्तीवीण कामा नये । युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥ मुक्त केल्या देवकोडी । सर्वही शक्तिच्या बळें । समर्थ भवानी माता । समर्थां वरु दीधला ॥ × × × × वोळतां भवानी माता । महींद्र दास्य इच्छिती । बोलणें हें प्रचीतीचें । अन्यथा वाउगें नव्हे ॥ —अध्यात्मसार, स्फुट काव्यें. आतां फक्त एकच उतारा देतों. त्यांत समर्थांनी आपल्या सांप्रदायाचीं लक्षणें विशद करून दाखविलीं आहेत. प्रथम लिहिणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थांतर ॥ १ ॥ आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिती । पांचवी प्रचीती अनुभवें ॥ २ ॥ साहावें तें गाणें सातवें नाचणें । टाळि वाजवणें आठवें तें ॥ ३ ॥ नवा अर्थभेद दाहावा प्रबंध । आक्रावा प्रबोध प्रचीतीसी ॥ ४ ॥ १. हठवादी. २. गर्विष्ठ. ३. समुदाय. ४. छिंद्रे. ५. दोष.
९० उपोद्घात. बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥ ५ ॥ पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अवेगता ॥ ६ ॥ प्रसंग जाणावा हां गुण सत्रावा । काळ समजावा सर्वांठायीं ॥ ७ ॥ आठ्रावें लक्षण वृत्ती उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥ ८ ॥ येकोणीसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥ विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जना भक्तिरंगें ॥ १० ॥ हरिकथानिरूपण, राजकारण व सावधपण हीं जीं रामदासी सांप्रदायाचीं तीन प्रमुख अंगें त्यांचीं एकंदर २० लक्षणें समर्थांनीं वरील कवितेंत सांगितलीं आहेत. त्यांचें मनन करून तीं आपल्या अंगीं बाणण्याचा प्रयत्न करणारास प्रपंच व परमार्थ यांचा उत्कृष्ट प्रकारें लाभ होतो,’ असें समर्थांचें अनुभवजन्य वचन आहे. त्याकडे प्रस्तुतकालीन महाराष्ट्राचें लक्ष वेधावें अशी सदाशा प्रगट करून लेखणी खालीं ठेवतॉ.
श्रीदासबोध. दशक पहिला. १ ग्रंथारंभनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥ ग्रंथनाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथें बोलिला विशदें । भक्तिमार्ग ॥ २ ॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्या- चें लक्षण । बहुधा अध्यात्मनिरूपण । निरूपिलें ॥ ३ ॥ भक्तीचेनि योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राय । इये ग्रंथीं ॥ ४ ॥ मुख्य भक्तीचा निश्चय । शुद्ध ज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलि- ला असे ॥ ५ ॥ शुद्ध उपदेशाचा निश्चय । सायुज्य मुक्तीचा निश्चय । मोक्ष- प्राप्तीचा निश्चय । बोलिला असे ॥ ६ ॥ शुद्ध स्वरूपाचा निश्चय । विदेहें- स्थितीचा निश्चय । अलिप्तपणाचा निश्चय । बोलिला असे ॥ ७ ॥ मुख्य देवाचा निश्चय । मुख्य भक्ताचा निश्चय । जीवशिवांचा निश्चय । बोलिला असे ॥ ८ ॥ मुख्य ब्रह्माचा निश्चय । नाना मतांचा निश्चय । आपण कोण हा निश्चय । बोलिला असे ॥ ९ ॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्व- लक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचें लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥ नाना १. स्पष्ट, स्वच्छ. २. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवा, पूजा, वंदन, दास्य, सख्य व देहसमर्पण अशी नऊ प्रकारची. ३. शुद्ध ब्रह्मीं लीन होणें. ५. देहाभिमानरहित स्थितीचा. ६. मायेच्या उत्पत्तीचें. ७. पृथ्वी, उदक, अग्नि, वायु आणि आकाश यांचें.
२ श्रीदासबोध. [ दशक किंतु निवारले । नाना संशय छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्र- श्न ॥ १२ ॥ ऐसें बहुधा निरुपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वेचे कीं कदा ॥ १३ ॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडोनि केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥ नाना ग्रंथांच्या संमती । उपनिषदें वेदान्त श्रुती । आणि मुख्य आ- त्मप्रतीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥ नाना संमतिअन्वयें । म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । तथापि हें अनुभवास ये । प्रत्यक्ष आतां ॥१६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उच्छेदिती । नाना ग्रंथांच्या संमति भ- गवद्वाक्यें ॥ १७ ॥ शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदान्त ॥ १८ ॥ भगवद्गीता ब्रह्मगीता । हंस- गीता पांडवगीता । गणेशगीता यमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥ इत्यादिक नाना ग्रंथ । संमर्ता.स बोलिले येथ । भगवद्वाक्यें यथार्थ । निश्चयेंसी ॥२०॥ भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणें येथीलें ॥ २१ ॥ पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुरभिमान । मत्सर करी ॥२२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥ ऐसा अंतरीं नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावें पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांचि पावला । मृत्यु राहू ॥ २५ ॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरुपिलें । संकलितें मॉगें ॥२७॥ आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तात्काळ । तुटे संशयाचें मूळ । एकसरां ॥ २८ ॥ मार्ग सांपडे सुगम । नलगे साधन दुर्गम । सायुज्यमुक्तीचें वर्म । ठांई पडे ॥२९॥ नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फलश्रुति । इये ग्रंथीं ॥ ३० ॥ योगियांचें परम भाग्य । अंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्यकळा यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥ आंत अवगुणी १. सांगितलें जात नाही. २. वेदांतील एक भाग. ३. लिप्त झाला. ४. विचा- रूं. ५. संक्षिप्त रीतीनें.
१ सा.] गणेशस्तवन. ३ अवलक्षण । तेचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समय जाणती ॥ ३२ ॥ आळसी तेचि साक्षेपी¹ होती । पापी तेचि पस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥ बद्धचि होती मुमुक्षू² । मूर्खचि होती अतिदक्ष । अभक्तचि पावती मोक्ष । भक्तिमार्गों ॥ ३४ ॥ नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥३५॥नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंतु संदेहाचे । नाना उद्वेग³ संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥ ऐसी याची फलश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनासी होय विश्रांती । समाधानें ॥ ३७ ॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसां⁴। तयासी तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदास- बोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके ग्रंथारंभनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥१॥ २. गणेशस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमोजी गणनायका । सर्वसिद्धिफलदायका । अज्ञानभ्रांतिछेदका ॥ बोधरूपा ॥ १ ॥ माझिये अंतरीं भरावें ॥ सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाक्शून्यासि वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २ ॥ तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें⁶ । आणि विश्वभक्षकें काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥ येतां निजकृपेची उडी । विघ्नें कांपती बापु- डीं । होऊनि जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥ म्हणोनि नाम विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर । आदिकरूनी हरिहर । अमर वंदिती ॥ ५ ॥ वंदूनियां मंगलनिधी । कार्य करितां सर्व सिद्धी । आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥ ६ ॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं निघोनियां मन । पांगुळे सर्वांगीं ॥ ७ ॥ सगुण रूपाची ठेव । महालावण्य- लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्थ होती ॥ ८ ॥ सर्वकाळ मदोन्म- त्त । सदा आनंदें डोलत । हर्षे निर्भरें उदितें⁷ । सुप्रसन्नवदन ॥ ९ ॥ भव्य रूप वितंड । भीममूर्ति महाप्रचंड । विस्तीर्ण मस्तक उदंड । सिंदूर चर्चिला १. मोठे उद्योगी. २. मुक्त होण्याची इच्छा करणारे. ३. दुःखें. ४. पुरुष. ५. मूर्खास. ६ पडदे. ७. अतिशय उल्हसित.
२ श्रीदासबोध. [ दशक ॥ १० ॥ नाना सुगंध परिमळें । थबथबां गळती गंडस्थळें । येथें आलीं षट्पदेंकुळें² । झंकारशब्दें ॥ ११ ॥ मुरडींव शुंडादंड³ सरळें । शोभे अभि- नवें आवाळें⁴ । लंबित अधर⁶ तीक्ष्ण गळे । क्षणक्षणा मद स्रंवी ॥ १२ ॥ चौदा विद्यांचा गोसावी । ह्रस्व लोचन⁸ ते हालवी । लवलवीत फडकावी । फडे फडे कर्णथापा ॥ १३ ॥ रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळें⁹ । कुंडले तळपती नीळ । वरी जडले झळकती ॥ १४ ॥ दंत शुभ्र सदंतं । रत्नखचित हेमकटें¹¹ । तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु- लघू¹² ॥ १५ ॥ लवलवीत मैलपे दोंद । वेष्टित कटी नागबंद । क्षुद्रें घंटिकीं मंदमंद । वाजती झणत्कारें ॥ १६ ॥ चतुर्भुज लंबोदर । कांसे कसिला पीतां- बर । फडके दोंदीचा फणिवरें¹⁵ । फुधुःकार टाकी ॥ १७ ॥ डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालूनी बैसला वेंटाळी । उभारोनी नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८ ॥ नानार्थायती¹⁶ कुसुममाळा । न्यौळपर्यंत¹⁷ रुळती गळां । रत्न- जडित हृदयकमळा-। वरी पदक शोभे ॥ १९ ॥ शोभे परश आणि कमळ । अंकुश तीक्ष्ण तेजाळ । एके करीं मोदकगोळ । तयावरी आंतप्रीती ॥ २० ॥ नटनाट्य कळाकुसरीं¹⁸ । नानाछंदें नृत्य करी । टाळ मृदंग भरोवरी¹९ । उपांग²⁰ हुंकारे ॥ २१ ॥ स्थिरता नाहीं एक क्षण । चपळविषयीं अग्रगण । साजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२ ॥ रुणझुणा वाजती नूपुरें²¹। वांकी शोभांटती²² गजरें । घागरियांसहित मनोहरें । पाउलें दोन्ही ॥ २३ ॥ ईश्वर- सभेसी आली शोभा । दिव्यांबराची फांकली प्रभा । साहित्यविषयीं सुल- भा । अष्टनायका होती ॥ २४ ॥ ऐसा सर्वांगें सुंदर । सकळ विद्यांचा आगरु²³॥ त्यासी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ २५ ॥ ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होय आतां । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६ ॥ जयास ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडें किती । असो प्राणी मंद- मती । तिहीं गणेश चिंतावा ॥ २७ ॥ जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीना- १. सुवास. २. भ्रमरांचा समुदाय. ३. सोंड. ४. कोमल. ५. गंडस्थळ. ६. ओठ. ७. वाढणारा. ८. नेत्र. ९. प्रभा. १०. बळकट, मोठे. ११. सोनेरी. १२. हळूहळू. १३. झाले. १४. लहान, घागऱ्या. १५. नाग. १६. अनेक जातीच्या. १७. सर्पापर्यंत. १८. कौशल्यानें. १९. सामग्री. २०. उपसाहित्य. २१. पैजण. २२. वाजती. २३. खाण.
१ दा.] शारदास्तवन. हूनी हीन । तेचि होती दक्ष प्रवीण । सर्व विषयीं ॥ २८ ॥ ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ । सप्रचीत भजनस्वार्थ । कलौ चंडीविनायकौ ॥ २९ ॥ ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला यथामती । वांछा धरूनियां चित्तीं । परमार्थाची ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके गणेशस्तवनं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. शारदास्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता¹ शब्दमूळ वाग्देवता । महामाया ॥ १ ॥ जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी² अपार । जे निःशब्दाचें अभ्यंतर । उकलू्नि दावी ॥ २ ॥ जे योगियांची समाधी । जे धारिष्टाची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या³ उपाधी । तोडूनि टाकी ॥ ३ ॥ जे महा पुरुषाची भार्या । अति संलग्न अवस्था तुर्या⁴ । जि- येचेनि महत्कार्या । प्रवर्त्तले साधु ॥ ४ ॥ जे महंतांची शांती । जे ईश्वराची निजशक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराश्यशोभा ॥ ५ ॥ जे अनंत ब्रह्मां- डें घडी । लीलाविनोदांचि मोडी । आपण आदिपुरुषीं दृढी । मारूनि राहे ॥ ६ ॥ जे प्रत्यक्ष पाहतां आठळे । विचार घेतां नाढळे । जियेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७ ॥ जे सर्वनाटक-अंर्तकळा । जे जाणीव स्फूर्ति निर्मळा । जियेचेनि स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८ ॥ जे लावण्य स्वरू- पाची शोभा । जे परब्रह्मसूर्यांची प्रभा⁵ । शब्दां वदोनि उभा । संसार नाशी ॥ ९ ॥ जे मोक्षश्रिया महामंगळा । जे सत्रांवी⁶ जीवनकळा । जे सत्वलीला सुशीला⁷ । लावण्यखाणी ॥ १० ॥ जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती । जे विस्तारें वाढली इच्छाशक्ती । जे काळिकाळाची नियंती । सद्गुरुकृपा ॥ ११ ॥ जे पर- मार्थमार्गाचा विचार । निवडोनि दावी सारासार । भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२ ॥ ऐसी बहु वेषें नटली । माया शारदा⁸ एकली । १. सरस्वती. २. वाणीनें. ३. अज्ञान. ४. चवथी अवस्था, समाधि. ५. तेज. ६. लिंगदेहांत सोळा तत्वें आहेत, त्यांस चाळविणारी-सतरावी कळा. ७. चांगल्या स्वभावाची. ८. सरस्वती.
६ श्रीदासबोध. [ दशक सिद्धांचे अंतरीं संचली । चतुर्विधें प्रकारें ॥ १३ ॥ तिहीं वाचां अंतरीं आलें । तें वैखरीया प्रगट केलें । म्हणोनि कर्तृत्व जितुकें झालें । तें शारदा- गुणें ॥ १४ ॥ जे ब्रह्मादिकांची जननी । हरि हर जियेपासुनी । सृष्टिरचना लोक तिन्ही । विस्तार जियेचा ॥ १५ ॥ जे परमार्थाचें मूळ । नातरी सद्धिद्याच केवळ । निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६ ॥ जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं । जे सिद्धांचे अंतःकरणीं । समा- धिरूपें ॥ १७ ॥ जे निर्गुणाची^२ ओळखण । जे अनुभवाची खूण । जे व्यापक- पणें संपूर्ण । सकळां घटीं ॥ १८ ॥ शास्त्रें पुराणें वेद श्रुती । अखंड जियेचें स्तवन करिती । नाना रूपें जियेस स्तविती । प्राणिमात्र ॥ १९ ॥ जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरुपमाची उपमा । जियेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २० ॥ नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयांची बुद्धी । जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञप्तिमात्र ॥ २१ ॥ जे हरिभक्तांची निजभक्ती । जे अंतर्निष्ठांची अंतरस्थिती । जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायुज्यता ॥ २२ । जे अनंत माया वैष्णवी । नकळे नाटक लाघवी । जे थोरथोरांस गोंवी । जाणतपणें ॥ २३ ॥ जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें । जें जें मनास भासलें । तितुकें रूप जियेचें ॥ २४ ॥ स्तवन भजन भक्तिभाव । जियेवांचूनि नाहीं ठाव । या वचनाचा अभिप्राय । अनुभवी जाणती ॥ २५ ॥ म्हणोनि थोराहूनि थोर । जे ईश्वराची ईश्वर । तिये माझा नम- स्कार । तदंशेंचि आतां ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथम- दशके शारदास्तवनं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. सद्गुरुस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शां शकेना तें स्वरूप मज अज्ञाना । काय कळे ॥ १ ॥ न कळे न कळे नेति^४ नेती^४ । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेलें कोठें ॥ २ ॥ मज न कळे हा विचार दुरून माझा नमस्कार । गुरुदेवा पैलपार । पाववी मज ॥ ३ ॥ होती १. परा, पश्यंती, मध्यमा, आणि वैखरी. २. निराकार ब्रह्माची. ३. विष्णूची. ४. हें नव्हे, हें नव्हे. ५. शिरेल.
१ ला. ] सद्गुरुस्तवन. स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भरवसा । आतां असाल तैसे असां । सद्गुरु स्वामी ॥ ४ ॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांच्छित होतें मन । ते माया जाहली लज्जायमान । काय करूं ॥ ५ ॥ नातुडे¹ मुख्य परमात्मा । म्हणोनि करावी लागे प्रतिमा² । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥ ६ ॥ आपुल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्या- नीं । तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तवूं आतां ॥ ७ ॥ जयजयाजी सद्गुरुराजा । विश्वंभरा विश्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधू ॥ ८ ॥ तुझियेनि अभय करं । अनावर माया हे वोसरे³ । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोनि जाय ॥ ९ ॥ आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । निशीं⁴ जाहलिया नंतरें । पुन: काळोखें ॥ १० ॥ तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्यूंचा वाव⁵ । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११ ॥ सुव- र्णाचें लोह कांहीं । सर्वथा होणार नाहीं । तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥ कां सरितां⁶ गंगेशि मिळाली । मिळणी होतां गंगाचि जाहली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥ परी ते सरिता मिळणीमागें । वोहळ मानिजेल जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीचि होय ॥ १४ ॥ परिस आपणाऐसें करीना । सुवर्ण लोह पालटेना । उपदेश करी बहुत जना । अंकित⁷ सद्गुरूचा ॥ १५ ॥ शिष्यास गुरुत्व प्राप्त होय । सुवर्णें सुवर्ण करितां नये । म्हणोनि उपमा काय । सद्गु- रूसी परिसाची ॥ १६ ॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतचि क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७ ॥ उपमे द्यावा जरी मेरू । तरी तो जड पाषाण कठोरू । तैसा नव्हे कीं सद्गुरु । परम कोमळ दीनाचा ॥ १८ ॥ उपमेस द्यावें गगन । परी गगनापरीस तो नि- र्गुण । या कारणें दृष्टांत हीन । सद्गुरूसी गगनाचा ॥ १९ ॥ धीरपणें उपमूं जगतीं⁸ । तरी हेही खचेल कल्पांतीं । म्हणोनि धीरत्वासि दृष्टांतीं । हीन वसुंधरा⁹ ॥ २० ॥ आतां उपमेस द्यावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती । शास्त्रे मर्यादा बोलती । सद्गुरु तौं अमर्याद ॥ २१ ॥ म्हणोनि उप- १. जाणतां येत नाहीं. २. मूर्ति. ३. नाहीशी होते. ४. रात्र. ५. नाश. ६. नदी. ७. दास. ८. निराकार. ९. पृथ्वी. १०. सूर्य.
मेस उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर¹ । तरी तो भारवाही ॥ २२ ॥ आतां उपमेस द्यावें जळ । तरी तें कालांतरें ओटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥ सद्गुरुस उप- मावें अमृत । तरी अमर² धरिती मृत्युपंथ । सद्गुरुकृपा यथार्थ । अमराचि करी ॥ २४ ॥ सद्गुरुस म्हणावें कल्पतरू । तरी हा कल्पनातीत विचारू । कल्पवृक्षाचा अंगिकारू । कोण करी ॥ २५ ॥ चिंता मात्र नसे मनीं । कोण पुसे चिंतामणी । कामधेनूची दुभणी । निष्कामास न लगती ॥ २६ ॥ सद्गु- रूस म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥ स्वर्गलोक इंद्रसंपत्ती । हे कालांतरें विटंबती । सद्गुरु- कृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८ ॥ हरिहरब्रह्मादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश एक । सद्गुरुपद ॥ २९ ॥ तयास उपमा काय द्यावी । नाशवंत सृष्टि आघवी । पंचभौतिक उठाठेवी । न चले येथें ॥ ३० ॥ म्हणोनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीच्या खुणा ॥ अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके सद्गुरुस्तवनं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. संतस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान³ । जयांचेनि गुह्य ज्ञान । प्रगटे जनीं ॥ १ ॥ जे वस्तु परम दुर्लभ । जयाचा अलभ्य लाभ । तेंचि होय परम सुलभ । सत्संगेंकरूनी ॥ २ ॥ वस्तु प्रग- टाचि असे । पाहतां कोणासीच न दिसे । नाना साधनें सायासें । न पडे ठाईं ॥ ३ ॥ जेथें परीक्षावंत थकले । नातरी डोळसचि अंध झाले । पाहत असतांच चुकले । निज⁴वस्तूसी ॥ ४ ॥ जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकार्शे गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ सोळा कळीं पूर्ण शशी⁵ । दाखवूं शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळाराशी । तोहि दाखवीना ॥ ६ ॥ जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतू⁶ तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । १. शेष. २. देव. ३. आश्रय. ४. परब्रह्मास. ५. चंद्र. ६. कोळ्याचें सूत.
१ ला.] संतस्तवन. ९ अणुरेणुभादिक ॥ ७ ॥ चिरलें वालाग्रे तेंहि प्रकाशी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकासी । प्राप्त होय ॥ ८ ॥ जेथें आक्षेपें आटले । जेथें प्रयत्न पस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥ ९ ॥ बळें विवेकाची वेंगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १० ॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि शिणला निःशेष । वस्तु न सांगवे ॥ ११ ॥ वेदें प्रकाशिलें सर्वही । वेद- रहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं शकेना ॥ १२ ॥ तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्यांचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवण ॥ १३ ॥ विचित्र कळा ये मायेची । परी ओळखी न सांगवे वस्तूची । मायातीत अनंताची । संत सोर्य सांगती ॥ १४ ॥ वस्तूसि वर्णिलें न वैचे । तेंचि स्वरूप संतांचें । या कारणें वचनाचें । कार्य नाहीं ॥ १५ ॥ संत आनंदाचें स्थळ ॥ संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६ ॥ संत मोक्षाची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नातरी भक्तीची फलश्रुती । ते हे संत ॥ १७ ॥ संत धर्मांचें क्षेत्र । संत स्वरूपांचें सत्पात्र । नातरी पुण्यचि पवित्र । पुण्यभूमी ॥ १८ ॥ संत समाधींचें मंदिर । संत विवेकाचें भांडार । नातरी बोलिजे माहेर । सायुज्यमुक्तीचें ॥ १९ ॥ संत सत्याचा निश्चय । संत सार्थकाचा जय । संत प्राप्तीचा समय । सिद्ध- स्वरूप ॥ २० ॥ मोक्षश्रिया अलंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दारिद्री असंख्यात । नृपति केले ॥ २१ ॥ जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दान- शूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२ ॥ महाराजे चक्र- वर्ती । झाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायुज्यमुक्ती । देणार नाहीं । २३ ॥ जें त्रैलोक्याँ नाहीं दान । तेंचि करिती संतसज्जन । तया संतांचें महिमान । काय म्हणोनि वर्णावें ॥ २४ ॥ जें त्रैलोक्याहूनि वेगळें । जें वेदश्रुतींसी नौकळे । तेंचि जयांचेनि वोळे परब्रह्म अंतरीं ॥ २५ ॥ ऐसी १. केंसाचें अग्र. २. शंका, प्रश्न. ३. वेंगडी वळे–विवेक संकुचित होतो, असा भाव. ४. मार्ग. ५. न जाई, वर्णिले जात नाहीं. ६. पुण्य उत्पन्न होण्याचें स्थळ. ७. ब्रह्माचें. ८. ब्रह्मरूप होणें एतद्रूप मुक्तीचें. ९. मोक्षरूप लक्ष्मीनें. १०. सार्वभौम. ११. समजत नाहीं.
१० श्रीदासबोध. [ दशक संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा प्रगट होय ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके संत- स्तवनं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. श्रोतृस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १ ॥ एक सत्वाचे सागर । एक बु- द्धीचे आगर । एक श्रोते वैरागरे । नाना शब्दरत्नांचे ॥ २ ॥ जे नाना अर्थामृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्त्याचे वक्ते । नाना संशयाचे छेदिते । नि- श्चयी पुरुष ॥ ३ ॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नातरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥ कीं ऋषीश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागैळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५ ॥ हृदयीं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विलासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६ ॥ जे पवित्रपणें वैश्वानरें । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टी- समोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥ जे अखंड सावधान । जयांसि त्रिकाळींचें ज्ञान । सर्वकाळ निरभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रासि लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९ ॥ जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांसि पूर्वीच ठावें । तेथें काय अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १० ॥ परंतु हे गुणग्राहक । म्हणोनि बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काय एक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥ सदा सेवती दिव्यान्नें । पालटाकारणें अवीट अन्नें । तैसीं हीं माझीं वचनें । प्राकृत ॥ १२ ॥ आपुले शक्त्यनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३ ॥ तैसा मी एक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । त्यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४ ॥ व्युत्पत्ति नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंध नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौळ्यतां नाहीं वचनाची ॥ १. धैर्याचे, किंवा सत्वगुणाचे. २. खान. ३. सत्वगुणानें अधिक. ४. वेदांत वर्णन केलेलें ब्रह्म. ५. अलंकारयुक्त भाषण. ६. बृहस्पति. ७. अग्नि. ८. वाणीनें वरळणारा, वाचाट. ९. रसाळपणा.
१५॥ ऐसा माझा वाग्विलास । निःशंक बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणोनियां ॥ १६ ॥ तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती । तेथें माझी व्युत्पत्ति किती । बुद्धिहीन अल्पमती । सलगी करितों ॥ १७ ॥ समर्थांचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याच्या अंगीं । तुम्हां संतांची मी सलगी । म्हणोनि करितों ॥ १८ ॥ व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयचकित होती लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढें खेळती ॥ १९ ॥ तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतापाशीं बोलत । परी माझी चिंता तुमचें चित्त । वाहेलचि कीं ॥ २० ॥ आपुलेंचि बोले वाडगें । त्याची संपादणी करणेंच लागे । परंतु कांहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१ ॥ हें तों प्रतीतीचें लक्षण । स्वभावेंचि करी मन । तैसे तुम्ही संत सज्जन । मायबाप विश्वाचे ॥ २२ ॥ माझा आशय जाणोनि जीवें । आतां उचित तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके श्रोतृस्तवनं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. कवीश्वरस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ आतां वंदूं कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १ ॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भूषण । यथार्थ होय ॥ २ ॥ कीं हे पुरुषार्थांचें¹ वैभव । कीं हे जगदीशाचें महत्व । नाना लाघव सत्की- र्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३ ॥ कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचें मुक्तें² सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर³ । निर्माण जाहले ॥ ४ ॥ कीं हे अध्यात्मरत्नाची खाणी । कीं हे बोलके चिंतामणी । नाना कामधेनूंची दुभणी । वोळली श्रोत्यांवरी ॥ ५ ॥ कीं हे कल्पनेचे कल्पतरू । कीं हे मोक्षाचे मुख्य पडिभरू⁵ । नाना सायुज्यतेचे विस्तारू । विस्तारले ॥ ६ ॥ कीं हा परलोकींचा निजस्वार्थे⁴ । कीं हा योगियांचा गुप्त पंथ । नाना ज्ञा- नियांचा परमार्थ । रूपासि आला ॥ ७ ॥ कीं हे निरंजनाची⁶ खूण । कीं हे
१. धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे. २. खुलें, मोकळें. ३. खाण ४. प्राप्त झाली. ५. आधार. ६. ब्रह्माची.
१२ श्रीदासबोध. [ दशक निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचें लक्षण । ते हे कवी ॥ ८ ॥ कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होय सुलभ । निजबोधें कविरूपें ॥ ९ ॥ कवि मुमुक्षूंचें अंजन । कवि साधकांचें साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १० ॥ कवि स्वधर्माचा आश्रय । कवि मनाचा मनोदय । कवि धार्मिकांचा विनय । विनयकर्ते ॥ ११ ॥ कवि वैराग्याचें रक्षण । कवि भक्तांचें भूषण । नाना स्वधर्मांचें स्थापन । ते हे कवी ॥ १२ ॥ कवि प्रेमळांची प्रेमस्थिती । कवि ध्यान- स्थांची ध्यानमूर्ती । कवि उपासकांची वांडे कीर्ती । विस्तारली ॥ १३ ॥ नाना साधनांचें मूळ । कवि नाना प्रयत्नांचें फळ । नाना कार्यसिद्धि सकळ । कवीचेनि प्रसादें ॥ १४ ॥ आधीं कवीचा वाग्विलास । तरी मग श्रवणीं तुंबले रस । कवीचेनि मतिप्रकाश । कवित्वास होय ॥ १५ ॥ कवि व्युत्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंताची सत्ता । कवि विचक्षणाची कुशलता । नाना प्रकारें ॥ १६ ॥ कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना घाटी मुद्रा छंद । कवि गद्यपद्य भेदाभेद । पदप्रास-कर्ते ॥ १७ ॥ कवि- सृष्टीचा अलंकार । कवि लक्ष्मीचा शृंगार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८ ॥ कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण । नाना सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९ ॥ कवि देवाचे रूपकर्ते । कवि ऋषींचें महत्त्व वर्णिते । नाना शास्त्रांचे सामर्थ्यांतें । कवि वाखाणिती ॥ २० ॥ नसता कवीचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार । म्हणोनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१ ॥ नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवीश्वरावीण तें नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२ ॥ मागां वाल्मीकव्यासा- दिक । जाहले कवीश्वर अनेक । तयांपासून विवेक । सकळ जनांसी ॥ २३ ॥ पूर्वी काव्यें होतीं केलीं । तरीच व्युत्पत्ति प्राप्त जाहली । तेणें पंडितांअंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जाहले कवीश्वर अपार । आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५ ॥ नाना चातुर्यां- च्या मूर्ती । कीं हे साक्षात् बृहस्पती । वेदश्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६ ॥ परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें । सेखीं बोलिलें १. आत्मज्ञान. २. मोठी. ३ शेवटीं.
पूर्णपणें । संशयातीत ॥ २७ ॥ कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवे- रसांचे वोघ लोटले । नाना सुखांचें उचंबळलें । सरोवर हें ॥ २८ ॥ कीं हीं विवेकनिधींचीं भांडारें । प्रकट जाहलीं मनुष्याकारें । नाना वस्तूंचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९ ॥ कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदा- र्थांसि आणि उणें । लाधलें पूर्वसंचिताच्या गुणें । विश्वजनांसी ॥ ३० ॥ कीं हीं सुखाचीं तारवें लोटलीं । अक्षय आनंदें डैतटलीं । विश्वजनांसी उपयोगा आलीं । नाना प्रयोगकारणें ॥ ३१ ॥ कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती । कीं हे भक्तीची फलश्रुती । फळासि आली ॥३२॥ कीं हा ईश्वराचा पॅवाड । पहातां गगनाहून वाड । ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंधरचना ॥ ३३ आतां असो हा विस्तार । जगासि आधार कवीश्वर । तयांसि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे प्रथमदशके कवीश्वरस्तवनं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. सभावर्णन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं सकळ सभा । जिये सभेसी मुक्ति सुलभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठत प्रेमभरें ॥ १ ॥ श्लोक ॥ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ १ ॥ टी० ॥ नाहीं वैकुंठींच्या ठायीं । नाहीं योगियांचे हृदयीं । माझे भक्त गाती जे ठाईं । तेथें मी तिष्ठत नारदा ॥ २ ॥ या कारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोष गडगडाट । जयजयकारें गर्जती ॥३॥ प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवद्वाक्यें हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणांचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५ ॥ नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकांनिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ती । वाग्विलासें ॥ ६ ॥ भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत १. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, वीभत्स, रौद्र आणि शांत या नऊ रसांचे. २. उचंबळून आलीं. ३. विश्वस्वरूप ईश्वराची. ४. कीर्ति, मोठेपणा. ५. वेदान्तविद्या. ६. गंभीर.