दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 34, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. ३१ अचूक चुकेना कोठें । त्याचीं राज्यें समस्तही ॥ युक्तीनें चालती सेना । युक्तीनें युक्ति वाढवी । संकटीं आपणा रक्षी । रक्षी सेना परोपरीं ॥ × × × × चोरटीं होरेंटीं तुंदें² । नासकें लांच इच्छिती । लाँढीचे दुरी घालावे । मारावे राजकारणें ॥ लोकांसी राखणें राजी । तें राज्य प्रबळे बळें । बंद बेबंद जाणावे । तांबे ताबे परोपरीं ॥ खेंळ खोचरें काढावे । तंदुळासारिखे खडे । खरें तें आदरें घ्यावें । खोटें सर्वत्र ताकिती ॥ कांहींएक परिक्षावें । शोधावें बहुतांपरीं । नेटकें कार्य साधावें । रोधावें कुटिला जना ॥ असो हें बोलणें जालें । युक्तीवीण कामा नये । युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥ मुक्त केल्या देवकोडी । सर्वही शक्तिच्या बळें । समर्थ भवानी माता । समर्थां वरु दीधला ॥ × × × × वोळतां भवानी माता । महींद्र दास्य इच्छिती । बोलणें हें प्रचीतीचें । अन्यथा वाउगें नव्हे ॥ —अध्यात्मसार, स्फुट काव्यें. आतां फक्त एकच उतारा देतों. त्यांत समर्थांनी आपल्या सांप्रदायाचीं लक्षणें विशद करून दाखविलीं आहेत. प्रथम लिहिणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थांतर ॥ १ ॥ आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिती । पांचवी प्रचीती अनुभवें ॥ २ ॥ साहावें तें गाणें सातवें नाचणें । टाळि वाजवणें आठवें तें ॥ ३ ॥ नवा अर्थभेद दाहावा प्रबंध । आक्रावा प्रबोध प्रचीतीसी ॥ ४ ॥ १. हठवादी. २. गर्विष्ठ. ३. समुदाय. ४. छिंद्रे. ५. दोष.