दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 33, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३० उपोद्घात. ( ३ ) राम उपासना माझी । त्रयलोक्य सुख पावलें । सोडिले देव इंद्रादि । तोडिलीं बंधनें बळें ॥ कीर्तीसी तुळणा नाहीं । प्रतापे आगळा बहु । न्याय नेमस्त हे लीळा । न भूतो न भविष्यति ॥ उन्मत्त रावणें येणें । त्रैलोक्य पीडिलें बळें ॥ देव ते घातले बंदी । कैपक्षी राम पावला ॥ श्रीरामांनीं सीताशुद्धि करून शक्ति ऊर्फ आदिमाया-जगज्जननी-हिची आराधना करून तिच्या वरप्रसादानें रावणाचा पराभव केला असें सांगून पुढें समर्थ म्हणतात:— ( ४ ) जगजनि रामवरदानी । तयीपासुनि बोलिजे । उदंड ऐकिलें होतें । प्रतीत मजला नसे ॥ प्रतापगिरीचें ठायीं । आदिशक्ती विराजते । कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं ॥ तुळजापुरीची माता । प्रतापेंचि प्रगटली ॥ आदिशक्ती माहंमाया । कुळीची कुळस्वामिनी ॥ कुळची पाळिलें आम्हां । रक्षिलें बहुतां परीं । तिची ते वैष्णवी माया । तारिते मारिते जनीं ॥ शक्तीनें पावती सुखें । शक्ती नसतां विटंबना । शक्तीनें नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥ कोण पुसे अशक्ताळा । रोगीसे बराडी दिसे । कळा नाहीं कांति नाहीं । युक्ति बुधी दुरावली ॥ साजिरी शक्ती तों काया । काया मायाचि वाढवी । शक्ती तों सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥ सार संसार शक्तीनें । शक्तीनें शक्ति भोगिजे । शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दारिद्रता ॥ शक्तीनें मिळती राज्यें । युक्तीनें यत्न होतसे । शक्ती युक्ती जये ठायीं । तेथें श्रीमंत धांवती ॥ युक्ती ते जाड कळा । विश्र्वकीसी तुळणा नसे ।