दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 28, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. २५ च्याच्या जिवावर पोट भरण्याचें कार्य करीत होते व हेंच आपलें कर्तव्य असें ते मानूं लागले होते. संन्यासी, विरक्त, साधु यांनीं तर ह्या परोपजीवी आयुष्य- क्रमास एकप्रकारचा प्रतिष्ठितपणा प्राप्त करून दिला होता. त्यामुळे समाजांत आलस्य व दौर्बल्य यांचा सुळसुळाट झालेला होता. अन्नवस्त्र हें प्रारब्धाधीन अथवा ईश्वराधीन आहे; त्याकरितां मनुष्यानें वृथा धडपड करण्याचें कारण नाहीं. त्यानें खुशाल घरीं हरि हरि करीत बसावें व 'असेल माझा हरि । तरी देईल खाटल्यावरी' या उक्तीचा आश्रय करून आळशी बनावें, आणि स्वतःच्या कुटुंबाचाहि भार समाजावर टाकावा, अशी अवस्था झाली होती. भक्तिमार्गानें उत्पन्न केलेली ही दुरवस्था नष्ट करण्यास भक्तिमार्गाचें समूळ उच्चाटन करणें हा एक पक्ष होता; व युरोपांतील 'रॅशनॅलिस्ट' लोकांप्रमाणें समर्थांनाहि ह्या मार्गाचें उच्चाटन करण्याचा यत्न करितां आला असता. परंतु येथेंहि पूर्वपरंपरा राखण्याचेंच धोरण त्यांनीं स्वीकारलें. कारण त्याचें उच्चाटन केल्यास अगोदरच विस्कळित झालेल्या समाजांत जी कांहीं थोडी बहुत नीतिमत्ता वावरत होती, तीहि नष्ट होण्याचा संभव होता. सामान्य जनतेच्या मनोभूमींतून भक्तीचें उच्चाटन करून परमेश्वराचें अधिष्ठान नाहींसें करणें म्हणजे त्यास धर्म व नीति यांपासून परावृत्त करून सैतान बनण्याच्या मार्गास लावणें आहे. असें करणें समाजव्यवस्थेच्या दृष्टीनें केव्हांहि हिताचें नसतें, म्हणून समर्थांनीं भक्तिमार्गाचें उच्चाटन न करितां त्या मार्गांत शिरलेले दोष काढून टाकून त्याच्याच द्वारें प्रपंच व परमार्थ यांकडे लोकांचें लक्ष लावून दिलें. परमार्थज्ञानाचे सागर असे जे सिद्ध पुरुष त्यांनीं परोपजीवनाचा व आलस्याचा मार्ग टाकून साधकाची भूमिका घेऊन लोकांना परमार्थाचा मार्ग दाखवावा असें दासबोधांत त्यांनीं अनेक ठिकाणीं प्रतिपादिले आहे. भक्तिमार्गाची तत्कालीन संन्यासप्रवण वृत्ति व नैराश्यवाद मोडून त्याच्या ठिकाणीं कार्यक्षमता व आशावादित्व उत्पन्न कर- ण्याचा समर्थांनीं किती जोरानें प्रयत्न केला हें त्यांच्या शिकवणींतील पुढील उताऱ्यांवरून दिसून येईल:— (१) वन्ही तो चेतवावा रे । चेतवितांच चेततो । विवेक जाणिजे तैसा । वाढवितांच वाढतो ॥ १ ॥ संग तो साक्षेपी याचा । धरितां साक्षेप घडे ।