दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 25, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२२ उपोद्धात. आहो. ती मोडून टाकून सबगोलंकार करण्याचे २।३ मोठे प्रयत्न परकीयांनीं व स्वकीयांनीं केले, परंतु त्यांना यश न येतां अद्यापर्यंत ती टिकाव धरून आहे; इतकेंच नव्हे, तर ज्या ज्या वेळीं हे प्रयत्न झाले, त्या त्या वेळीं तिचें रक्षण करण्या- करितां मोठमोठे महात्मे पुढें येऊन त्यांनीं बहुजनसमाजाच्या साह्यानें बंडखो- रांचा पाडाव करून धर्मरक्षण केलेलें आहे. यावरून येथील बहुजनसमाजास ही संस्था अत्यंत हिताची वाटत आहे, हें उघड दिसून येतें. अलीकडे पाश्चात्य संस्कृतीचा ह्या देशांत उदय झाल्यापासून ह्या संस्थेवर पुन्हा जोराचे हल्ले होऊं लागले आहेत. त्यांत स्वजनांनींहि तिच्यावर शस्त्र उचललेलें आहे. त्यांच्या ह्या आघातासहि ही संस्था दाद देणार नाहीं, याबद्दल आमची खात्री आहे. परंतु या लोकांस आम्हांस एवढेंच सुचावावयाचें आहे कीं, सुधारलेल्या पाश्चात्य समाजां- तील असंतुष्ट वृत्ति व त्यामुळे तेथें होणारी खळबळ यांचा विचार करितां ह्या संतोषप्रवण संस्थेचा आश्रय करणें हेंच परिणामीं हितकर होणार आहे. जर्मनीसारख्या सुधारलेल्या राष्ट्रांतील तत्वज्ञांनींहि तिकडे निराळ्या रूपानें याच *संस्थेचें बीजारोपण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेंच इतर पाश्चात्य
- प्रख्यात जर्मन तत्त्ववेत्ता नीच याच्या तत्त्वज्ञानाचें स्पष्टीकरण करीत असतां ए. एम्. लुडोव्हिगी नामक ग्रंथकार निचच्या एतद्विषयक मताचा निष्कर्ष येणें- प्रमाणें सांगतो:-- “ It is ridiculous to pretend to treat everyone without regard to those natural distinctions which are manifested by superior intellectuality, or exceptional muscular strength or mediocrity of spiritual and bodily powers, or inferiority of both. It is not the legislator, but nature herself, who esta- blishes these broad classes, and to ignore them when form- ing a society would be just as foolish as to ignore the order of rank among material and structural principles when building a manument. ........ Thus he (नीच) would have the intellectually superior, those who can bear responsibi- lity and endure hardships, at the head. Beneath them are the warriors, the physically strong who are the guardians