दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 22, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. १९ तत्कालीन महाराष्ट्रास उपदेश केला. नुसता उपदेशच करून समर्थ राहिले नाहींत, तर ह्या संघटनात्मक संस्था कशा स्थापाव्यात हें देखील त्यांनीं मोठ्या चतुरपणानें दाखवून दिलें आहे. समुदाय कसे करावेत, त्यांना कसें व काय शिकवावें, त्यांचा कोणत्या वेळीं कसा उपयोग करून घ्यावा याचें अगदीं खुला- सेवार वर्णन त्यांनीं आपल्या दासबोधांत जागोजागीं केलेलें आहे. नुसतें शाब्दिक वर्णन करूनच ते थांबले नाहींत, तर त्यांनीं स्वतः त्याप्रमाणें आचरण करून उपदेशिलेलें तत्त्वज्ञान प्रचितीस आणून दिलेलें आहे. "मीं सांगितलेल्या गोष्टी मीं आधीं केल्या व नंतर त्यांचें निरूपण केलें" असें समर्थांनीं दास- बोधांत अनेक ठिकाणीं म्हटलेलें आहे.' त्यांनीं स्वसांप्रदायाचा विस्तार करण्या- करितां जो व्याप केला त्याची आतां महाराष्ट्रास बरीचशी माहिती झालेली असल्यामुळे समर्थांच्या ह्या वरील विधानासंबंधानें ('आधीं केलें मग सांगितलें') कोणी आशंका घेईल असें वाटत नाहीं. दुसरी गोष्ट अशी कीं, प्रचितीवांचून कोणाच्याहि उपदेशांत प्रायः जोमदारपणा येत नसतो. दासबोध ग्रंथांतील कोणताहि भाग घेतला तरी तो निःशंक असून जोमदारपणानें सर्वतोपरी मुस- मुसलेला आढळून येईल. तो वाचून समर्थांचा आत्मविश्वास फार विलक्षण होता असें तेव्हांच लक्ष्यांत येतें. येथून तेथून सारा दासबोध भेदक वक्तृत्वानें ठासून भरलेला आहे. त्यांत अनेक गहन विषयांचें विवेचन केलेलें आहे, परंतु तें सर्व अगदीं नेमक्या पण साध्या आणि औचित्यपूर्ण शब्दांत केलें असूनहि चित्ताकर्षक झालें आहे. तें इतकें कीं, (कित्येक लोक ह्या ग्रंथास 'काव्य' अशी संज्ञा देऊं लागले. वस्तुतः हा ग्रंथ 'काव्य' नाहीं; तो तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. असें असूनहि तो काव्य आहे असा जो भास होतो, तो दासांच्या चित्ताकर्षक विवेचनपद्धतीमुळेच होय. हा चित्तवेधकपणा नवरसात्मक अलंकारांनीं साधलेला नसून प्रचितीपूर्ण अशा भेदक व ठसकेदार शब्दरचनेनें साधलेला आहे.) हा ग्रंथ जो कोणी लक्ष्यपूर्वक वाचील, त्याचे ठायीं सामान्यतः मुमुक्षुत्वाचा उदय झालाच पाहिजे, असें म्हणण्यास हरकत नाहीं; मुमुक्षुत्व बाणलें कीं, त्यांतील उपदेशाचें खोल रहस्य मनुष्याच्या लक्षांत येऊं लागतें आणि तें लक्षांत येऊन त्याप्रमाणें आचरण घडल्यास मोक्षाची ऊर्फ स्वातंत्र्याची प्राप्ति निःसंशय होते, असा ह्या ग्रंथाचा महिमा आहे !