भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 23, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 23

२० उपोद्घात. दासांच्या शिकवणीचा दुसरा एक लक्षांत ठेवण्यासारखा विशेष असा आहे कीं, त्यांनीं धर्मस्थापना अगर राज्यस्थापना करण्याकरितां समुदाय ऊर्फ संघटना करण्याचें तत्व विशेष रीतीनें लोकनिदर्शनास आणून दिलेलें आहे. आणि तसें करण्यांत, हें कार्य पिढ्यानपिढ्या चालू रहावें, हाच त्यांचा हेतु स्पष्ट दिसतो. ते म्हणतात:— आपण अवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावावें । बहुत लोक । ( १२-१०--३३) संघटना करून राष्ट्रोद्धार करण्याचा मार्ग समर्थांपूर्वी त्यांच्याइतका कोणीहि विशद करून सांगितलेला नाहीं. तो सांगून व त्याप्रमाणें प्रत्यक्ष कृती करून भावी पिढ्यांस त्यांनीं एक सुंदर उदाहरण घालून दिलेलें आहे. आणि ज्या ज्या वेळीं महाराष्ट्रास विपन्नावस्था प्राप्त होईल, त्या त्या वेळीं समर्थांनीं घालून दिलेल्या ह्या उदाहरणाचें व त्यांनीं दाखवून दिलेल्या मार्गाचें मनन केल्यास त्यापासून फायदा होण्यासारखा आहे. समर्थांचे वेळीं भरतखंडांत धर्माला जी ग्लानि आली होती, तीस परधर्मी राज्यकर्त्यांप्रमाणें स्वधर्मी लोकहि कारणीभूत झालेले होते. स्वदेशी शासन- संस्थेच्या अभावामुळे ह्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या मनावरचा दाब नष्ट होऊन ते स्वैराचार करूं लागले होते व त्यांपैकीं जे पढतमूर्ख होते ते 'सर्व- ब्रह्म'वादी बनून वर्णसंकर ऊर्फ सबगोलंकार करण्यास उत्तेजन देत होते. त्या- मुळें समाजांत मोठा घोटाळा माजून राहिला होता. त्या स्थितीचें वर्णन दास- बोधांत आहे. मासल्याकरितां त्यांतील कांहीं उतारे पुढें देतों:— मतामतांचा गलबला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ ( ११-२-२५) × × × × × ब्रह्मरूप जालें आघवें । तेथें काय निवडावें । अवघी साखरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥ तैसें सार आणि असार । आवघा झाला एकंकार । तेथें बळावला अविचार । विचार कैचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें ।