भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 133, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 133

९८ श्रीदासबोध. [ दशक क्षिती १ । तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ती कैंच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ । सायुज्यमुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९ ॥ निर्गुणीं अनन्य २ असतां । तेणें होय सायुज्यता । सायुज्यता म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥ सगुण भक्ति ते चळे । निर्गुण भक्ती ते न चळे । हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलिया ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके मुक्तिचतुष्टयनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९६. दशक पांचवा. १. गुरुनिश्चय. श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मया- रामा । अनिर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १ ॥ जें वेदांसि सांकडें ३ । जें शब्दासि कोंडडें ४ । तें सच्छिष्यासि रोकडें । अलभ्य लाभे ॥ २ ॥ जें योगियांचें निज वर्म ५ । जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निज- विश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३ ॥ तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणाचि होइजे अंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना ६ सर्वथा ॥ ४ ॥ आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजती तेणेंप्रमाणें । मुमुक्षें शरण जावें ॥ ५ ॥ गुरु तो सकळांसि ब्राह्मण । जरी तो जाहला क्रियाहीन ७ । तरी तयासि शरण । अनन्यभावें असावें ॥ ६ ॥ अहो या ब्राह्मणांकारणें । अवतार घेतला नारायणें । विष्णूनें श्रीवत्स मिरवणे । तेथें इतर ते किती ॥ ७ ॥ ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्राचे ब्राह्मण । धातु- पाषाणीं देवपण । ब्राह्मणाचेनि मंत्रें ॥ ८ ॥ मुंजीबंधनाविरहित । तो शूद्रचि निर्भ्रांत । द्विजन्मा म्हणोनि सतत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९ ॥ सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्र- माण ८ । अप्रिय भगवंता ॥ १० ॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं १. पृथ्वी. २. एकनिष्ठ. ३. जाणण्यास कठीण. ४. अवघड. ५. गुह्य गोष्ट. ६. मळानें मळत नाहीं. ७. आचारभ्रष्ट. ८. प्रमाण नव्हे.