दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 134, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंसकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्यें- करोनि ॥ १२ ॥ ब्राह्मणपूजनें शुद्धवृत्ति । होऊनि जडे भगवंतीं । ब्राह्मण- तीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३ ॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । अन्य यातीस पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरां चाड नाहीं ॥ १४ ॥ असो ब्राह्मणास सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५ ॥ अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊनि काय करावा । ब्राह्मणासन्निध पू जावा । हैं तौं घडेना कीं ॥ १६ ॥ जें जें जनावेगळें केलें । तें तें वेदें अव्हेरिलें । म्हणोनि तयास नाम ठेविलें । पांखाड मत ॥ १७ ॥ असो जो हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विश्वास । ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८ ॥ ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्गुरु करावा । ऐसें म्हणाल तर निजठेवा । सद्गुरूविण नाहीं ॥ १९ ॥ स्व- धर्मकर्मीं पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरूविण । ब्रह्मज्ञान नसतां क्षीण । जन्ममृत्यु चुकेना ॥ २० ॥ सद्गुरूविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाही । वाहातचि गेले ॥ २१ ॥ ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ झालें । म्हणोनि सद्गुरूचीं पाउलें । सदृढ धरावीं ॥ २२॥ जयास वाटे देव व्हावा । तेणें सत्संग धरावा । सत्संगेंवीण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३ ॥ नाना साधनें बापुडीं । सद्गुरूविण करिती वेडीं । गुरुकृपेविण कुडकुर्डीं । व्यर्थचि होती ॥ २४ ॥ कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें । गोरांजनें धूम्रपानें । साधीती पंचाग्नी ॥ २५ ॥ हरि- कथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण । सर्व तीर्थे परम कठिण । क- रिती प्राणी ॥ २६ ॥ झळफळीत देवतार्चनें । स्नान संध्या दर्भासनें । टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७ ॥ अर्घ्यपात्रें संपुट गोकर्णे । मंत्र- यंत्रांचीं ताम्रपर्णै । नानाप्रकारीं उपकरणें । साहित्यशोभा ॥ २८ ॥ घंटा १. इतरांची गरज. २. महारमांग. ३. स्वरूपाची प्राप्ति. ४. निरुपयोगी. ५. ईश्वरप्राप्तीसाठीं स्वतःला जाळून घेणें. ६. झाडाला टांगून घेऊन खालीं केलेला धूर पिणें. ७. सभोवार चार अग्नी पेटवून मस्तकावर सूर्याचें ऊन घेणें. ८. तांब्याचे पत्र्यावर कांहीं रेखाकृति काढून मंत्र साधणें. ९. पूजेच्या सामुग्रीचा थाट.