दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 135, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१०० श्रीदासबोध. [ दशक घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणि स्तुती । आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्षिणा नमस्कार ॥ २९ ॥ पंचायतनपूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें ला- खोली । फळें नारिकेलें भरलीं । संपूर्ण सांग पूजा ॥ ३० ॥ उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती वर्म १ । चुकले प्राणी ॥३१॥ यज्ञादिक कर्मे केलीं । हृदयीं फळाशा कल्पिली । आपुले इच्छेनें घेतली । सूति जन्माची ॥ ३२ ॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास । ऋद्धिसिद्धी सावकाश । वोळल्या जरी ॥ ३३ ॥ तरी सद्गुरु- कृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित । यमपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ॥ ३४ ॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती २ । गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ति- भाव आणि भजन । सकळही फोल ब्रह्मज्ञान । जंव तें प्राप्त नाहीं ॥३६॥ सद्गुरुकृपा न जोडे । आणि भलतीकडे वावँडे ३ । जैसें आंधळें चांचरूनि पडे । गौरीं ४ आणि गडदरीं ५ ॥ ३७ ॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस नि- र्धान ६ । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान-। प्रकाश होय ॥ ३८ ॥ सद्गुरुविण जन्म निष्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ॥ ३९ सद्गुरूचेनि अभयकरें । प्रकट होईजे ईश्वरें । जन्मदुःखें अपारें । ना- सोनि जाती ॥ ४० ॥ मागां झाले थोर थोर । संत महंत मुनीश्वर । तयां सहि ज्ञानविचार । सद्गुरूचेनि ॥ ४१ ॥ श्रीराम कृष्णादि करूनी । अति- तत्पर गुरुभजनीं । सिद्धसाधु आणि सज्जनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२ ॥ सकळ सृष्टीचे चालक । हरिहरब्रह्मादिक । तेहि