भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 136, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 136

५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०१ २. सद्गुरुलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणजेती । परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १ ॥ सैभामोहन भुरके चेटके । सौवरी मंत्रकौटाळे अनेके । नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २ ॥ सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ५ । दृष्टिबंधन ६ लाँगवेग । अभिलाषाचा ॥ ३ ॥ ८ साहित्य संगीत रागज्ञान । गीत नृत्य तानमान । नाना वाद्यें शिकविती जन । तेहि एक गुरु ॥ ४ ॥ विद्या शिकविती पंचा- क्षरी । तोडे ९ तोटगे १० नानापरी । कां पोट भरे जयावरी । ते विद्या शिक- विती ॥ ५ ॥ जे यातीचा जो व्यापार । शिकविती भरावया उदर । तेहि गुरु परी साचार । सद्गुरु नव्हेती ॥ ६ ॥ आपुली माता आणि पिता । तेहि गुरुचि तत्वतां । परी पैलदार पावविता । तो सद्गुरु वेगळाची ॥ ७ ॥ गा- यत्री

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 136, कुल 467 में से · BharatKosha