भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 137, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 137

१०२ श्रीदासबोध. [ दशक भरी । उदारवचनें ॥ १७ ॥ वेदशास्त्र महानुभाव । पहातां एकचि अनुभव । तोचि एक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८ ॥ संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आ- दरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी । करूं चि नेणे ॥ १९ ॥ जें जें मन अं- गीकारी । तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे भिकारी । झेंडे आला ॥ २० ॥ शिष्यांसि न लाविती साधन । न करविती इंद्रियदमन । ऐसे गुरु अडक्याचे तीन । मिळाले तरी टाकावे ॥ २१॥ जो कोणी ज्ञान बोधी । समूळ ३अविद्या छेदी । इंद्रियदमन प्रतिपादी । तोचि सद्गुरु जाणावा ॥ २२॥ एक द्रव्याचे विकिले । एक शिष्याचे आँखिले । ऐसे दुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥ जें जें रुचे शिष्याचे मनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडिली गळां ॥ २४ ॥ जो गुरु भीडसारू । तो अधमाहूनि अधम थोरू । चोरटा मैंद पामरु । द्रव्यभोंदू ॥ २५ ॥ जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी । आणि शेखीं भीड करी । घात घेणार ॥ २६ ॥ तैसा सद्गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा । भीड करूनियां गोंवी । घाली बंधनाचा ॥ २७ ॥ जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणि स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८ ॥ देखणीं दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेंच ज्ञान तीं पामरें । अंतरलीं भगवंता ॥ २९ ॥ बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण । तेथेंच रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षीं ॥ ३० ॥ अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषयीं लोलंगतां । ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१ ॥ जैसा निरूपणसमय । तैसेंचि मनहि करी वायें । कृतबुद्धीचा निश्चय । जाहलाचि नाहीं ॥ ३२ ॥ निरूपणीं सामर्थ्यसिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी । डळमळूं लागे ॥ ३३ ॥ पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त । जयांस साह्य भगवंत । आणि सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४ ॥ ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञान नुसतें व्यर्थ । ऐसा सामर्थ्यांचा स्वार्थ । हृदयीं वसे ॥ ३५ ॥ निःशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते खोटे । शब्द- १. सत्पुरुष. २. काकुळतीस. ३. अज्ञान. ४. अंकित. ५. घातका. ६. राख- रांगोळी. ७. फांस. ८. शास्त्र, सद्गुरु व आपण स्वतः यांची. ९. अनुभव. १०. आसक्ति. ११. व्यर्थ. १२. बरोबरी. १३. हांव.