दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 138, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०३ ज्ञाते कामिक ॥ ३६ ॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं । कामना इच्छितांच मेलीं । यापुढीं मूर्ख ॥ ३७ ॥ निःशेष कामनारहित । ऐसा तो विरळा संत । अवघियांवेगळें मत । अक्षय ज्याचें ॥ ३८ ॥ अक्षय ठेवा सकळांचा । तरी पांगि फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जातो ॥ ३९ ॥ सिद्धि आणि सामर्थ्य जाहलें । सामर्थ्यं देहास महत्व आलें । पुढें बेचोंड बळकाविलें । देहबुद्धीचें ॥ ४० ॥ सांडूनि अक्षय सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणिक नाहीं ॥ ४१ ॥ ईश्वराविण जे कामना । तेणें गुणें नाना यातना । पावती ³होती पतना । वरपंडे प्राणी ॥ ४२ ॥ होतां शरीराचा अंत । सामर्थ्यहि निघोन जात । शेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३ ॥ म्हणोनि निष्कामना- विचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४ ॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५ ॥ याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदा- सीन केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषयीं ॥ ४६ ॥ याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथानिरूपण । जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥ जेथें सारासार विचार । तेथें होय जगदुद्धार । नवविध भक्तीचा आधार । बहुत जनांसी ॥ ४८ ॥ म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठिलें साधन । हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं ओळखावें ॥ ४९ ॥ अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन । तेथें बहुत भक्तजन । विश्रांति पावती ॥ ५० ॥ नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्माविणें अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१ ॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि साधन । कथानिरूपण श्रवण मनन । नीति न्याय मर्यादा ॥ ५२ ॥ यां- मध्यें एक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे । म्हणोनि सर्वहि विलसे । सद्गुरूपार्सी ॥ ५३ ॥ जो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता । नाना साधनें समर्था । सद्गुरूपार्सी ॥५४॥ साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे६ । तो मागुता सर्वैचि भ्रष्टे । या कारणें दूरदृष्टे । महानुभाव ॥५५॥ आचार उपा- १. क्षोभ. २. जुंबाड. ३. प्राप्त होतात. ४. स्वरूपाची जागृति राहणें. ५. चित्तशुद्धि करणारीं कर्मे सोडल्यांवर. ६. स्थापितो. ७. दूरवर नजर पोचविणारे.