दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 139, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१०४ श्रीदासबोध. [ दशक सना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती । कोणं पुसे ॥ ५६ ॥ कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाभैसे¹ झाला ठाव । तो कानकों- डा समुदाय । प्रपंचीं हासती ॥ ५७ ॥ नीच यातीचा गुरु । तोही कानकोंडा² विचारु । ब्रह्मसभेसि जैसा चोरु । तैसा दडे ॥ ५८ ॥ ब्रह्मसभे देखतां । तया- चें तीर्थ न ये घेतां । अथवा प्रसाद सेवूं जातां । प्रायश्चित्त पडे ॥ ५९ ॥ तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सट- वैली³ । एकाएकीं ॥ ६० गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्त्वतां । येथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१ ॥ ऐसीं सांकडीं दोहींकडे । तेथें प्रस्तावों⁴ घडे । नीच यातीस सद्गुरुत्व न घडे । या कारणें ॥ ६२ ॥ त- थापि आवडी घेतलीं जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांस भ्रष्ट- वावें । हें दूषणचि कीं ॥ ६३ ॥ आतां असो हा विचारु । स्वयातीचा पा- हिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्तें⁵ घडे ॥ ६४ ॥ जे जे कांहीं उत्तम गुण । तें तें सद्गुरूचें लक्षण । तथापि सांगों वोळखण । होय जेणें ॥ ६५ ॥ एक गुरु एक मंत्रगुरु । एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु । एक दस्तादगुरु एक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६ ॥ एक कुळगुरु एक मानिला गुरु । एक वि- द्यागुरु एक कुविद्यागुरु । एक असद्गुरु एक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७ ॥ एक मातागुरु एक पितागुरु । एक राजगुरु एक देवगुरु । एक बोलिजे जगद्गुरु । सकळ कळा ॥ ६८ ॥ ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणिक गुरु । ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९ ॥ एक स्वप्नगुरु⁶ एक दीक्षागुरु । एक म्हणती प्रतिमागुरु । एक म्हणती स्वयें गुरु । आपुला आपण ॥ ७० ॥ जे जे यातींचा जो व्यापार । ते ते यातीचे तितुके गुरु । याचा पाहतां विचारु । उदंड आहे ॥ ७१ ॥ असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु । परि मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२ ॥ नाना सद्धिचे गुण । त्याहिवरी कृपाळूपण । सद्गुरूचें हें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके सद्गुरुलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
१. बहकण्यास. २. तोंड लपविणारा. ३. सटवाईची बाधा होऊन झिजूं लागली. ४. पश्चात्ताप. ५. खचित. ६. स्वप्नांत येऊन उपदेश देणारा.