भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 140, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 140

१ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५ ३. सच्छिष्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण । आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १ ॥ सद्गुरूविण सच्छिष्य । तो वायां जाय निःशेष । कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरू शिणे ॥ २ ॥ उत्तम भूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडेंखाद । कां तें उत्तम बीज परी संबंध । खडकेसि पडिला ॥ ३ ॥ तैसा सच्छिष्य तो सत्पात्र । परी गुरु सांगे मंत्रतंत्र । तेथें अरैल ना परैल । कांहींच नाहीं ॥ ४ ॥ अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनधिकारी । भाग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५ ॥ तैसें एकाविण एक । होतसे निरर्थक । परलोकींचें जें सार्थक । तें दूरि दुरावे ॥ ६ ॥ म्हणोनि सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथें न लागती सायास । त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरां ॥ ७ ॥ सुभूमि आणि उत्तम कण । उगवेना पर्जन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नसतां होय ॥ ८ ॥ शेत पेरिलें आणि उगवलें । परंतु निगेविण गेलें । साधनेंविण तैसें झालें । साधकासी ॥ ९ ॥ जोंवरी पीक आपणासि भोगे । तोंवरी अवघेंचि करणें लागे । पीक आलियाहि उगें । राहूंच नये ॥ १० ॥ तैसें आत्मज्ञान झालें । तरी साधन पाहिजे केलें । एक वेळ उदंड जेविलें । तरी सामुग्री पाहिजे ॥ ११ ॥ म्हणोनि साधन अभ्यास आणि सद्गुरु । सच्छिष्य आणि सच्छास्त्र- विचारु । सत्कर्म आणि सद्वासना पारु । पाववी भवाचा ॥ १२ ॥ सद्गुपा- सना आणि सत्कर्म । सच्छिष्य सत्क्रिया आणि स्वधर्म । सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ॥ १३ ॥ ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान निवेळें । नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदायीं ॥ १४ ॥ येथें शर्ब्द नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्गुरूपार्शी । सद्गुरु पालटी अवगुणांसी । नाना यत्नेंकरूनी ॥ १५ ॥ सद्गुरूचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्गुरु न पालटे । कां जे थोरपण तुटे । म्हणोनियां ॥ १६ ॥ या कारणें सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे । नाहीं तरी होइजे । पाषांडीं वर- पेंडे ॥ १७ ॥ येथें सद्गुरूचें कारण । येर सर्व निष्कारण । तथापि सांगतों १. किड्यांनीं खाल्लेलें. २. इहलोक. ३. परलोक. ४. पाहिजे. ५. परिपक्व होतें. ६. बोल, दोष. ७. लाभतो. ८. स्वैराचारास. ९. प्राप्त.