दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 141, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१०६ 'श्रीदासबोध. [ दशक
वोळखण । सच्छिष्याची ॥ १८ ॥ मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९ ॥ शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ । शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २० ॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचि- ष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त¹ । सर्व प्रकार्रीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षे- पी² विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष्य³ । लक्षी⁴ ऐसा ॥ २२ ॥ शिष्य पाहिजे अतिधीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य पाहिजे अतितत्पर । परमार्थविषयीं ॥ २३ ॥ शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी । शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥ शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५ ॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत⁵ । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिमंत । मर्यादांचा ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे सतत । विचार घेता ॥ २७ ॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढव्रताचा⁶ । शिष्य पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्यशीळ ॥ २८ ॥ शिष्य असावा सात्विक । शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९ ॥ शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कार्याक्लेशी⁷ । शिष्य असावा पर- मार्थासी । वाढवूं जाणे ॥ ३० ॥ शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगन्मित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१ ॥ शिष्य असावा सद्दिद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा । शिष्य असावा अंतरींचा । परम शुद्ध ॥ ३२ ॥ शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य असावा संसारदुःखी । संतसंदेहीं ॥ ३३ ॥ जो संसारदुःखें दुखवला । जो त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी झाला । परमार्थासी ॥ ३४ ॥ बहुत दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे । संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५ ॥ जयास संसाराचा त्रास । तयासीच उपजे विश्वास । विश्वासबळें दृढ कांस । धरिली सद्गुरुची ॥३६॥ अविश्वासें कांस सोडिली ।
१. नियमितपणें वागणारा. २. उद्योगी. ३. लक्षांत घेण्यास कठीण, ब्रह्म. ४. लक्षांत घेई. ५. बुद्धिमान्. ६. निश्चयी. ७. देहकष्ट सहन करणारा.