दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 142, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंऐसीं बहुतेक भवीं बुडालीं । नाना जलचरीं तोडिलीं । मध्येंच सुखदुःखें ॥ ३७ ॥ या कारणें दृढ विश्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी विशेष । अग्रगण्य ॥ ३८ ॥ जो सद्गुरुवचनें निवाला । तो सायुज्यतेचा आं- खिला । संसारपांगें पांगिला । न वचे कदा ॥ ३९ ॥ सद्गुरूहुनि देव मोठा । जयास वाटे तो शिष्य करंटा । सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें ॥ ४० ॥ सद्गुरुस्वरूप तें संतें । आणि देवास मांडे कल्पांत । तेथें कैचें उ- रेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१ ॥ म्हणोनि सद्गुरुसामर्थ्य अधिक । जेथें अर्टती ब्रह्मादिक । अल्पबुद्धि मानव रंक । तयास हें कळेना ॥ ४२ ॥ गुरुदेवां बराबरी । करी तो शिष्य दुराचारी । भ्रांति बैसली अभ्यंतरीं । सिद्धांत नेणवे ॥ ४३ ॥ देव मनुष्यीं भाविला । मंत्रीं देवपणासि आणिला । सद्गुरु तो नवचे कलिपला । ईश्वराचेनी ॥ ४४ ॥ म्हणोनि सद्गुरु पूर्णपणें । देवाहूनि अधिक कोटिगुणें । जयास वर्णितां भांडणें । वेदशास्त्रां लागलीं ॥ ४५ ॥ असो सद्गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे । देवसामर्थ्य तें केवढें । मायाजनित ॥ ४६ ॥ असो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तया- पाशीं । ज्ञानबळें वैभवासी । तृणतुल्य केलें ॥ ४७ ॥ सद्गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्ष ज्ञानाचेनि उसाळें । मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥४८॥ ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव । तेणें गुणें देवराव । स्व- येंच होती ॥ ४९ ॥ अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध झालें । पुढें सद्गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥ लागतां सद्गुरुवचनपंथें । झालें ब्रह्मांड पालथें । तरी जयांच्या शुद्ध भावार्थे । पालट न धरिजे ॥५१॥ शरण सद्गुरुसि गेले । ते सच्छिष्य ऐसे निवडले । क्रियापालटें झाले । पावन ईश्वरीं ॥५२॥ ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वांटेकरी । येर मायिक वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३ ॥ वाटे विषयाचें सुख । परमार्थ संपादनें लौकिक । देखोदेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४ ॥ झाली विषयीं वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार । परमार्थचर्चेचा विचार । मलिन जाहला ॥ ५५ ॥ मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भारवाही
१. सुखदुःखरूपी जलचरांनीं. २. सेवक. ३. संसारांतील दैन्यानें. ४. दीन केला. ५. नित्य. ६. मंदावतात. ७. कल्पिला. ८. अनुभवाचें.