दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 143, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१०८ श्रीदासबोध. [ दशक कुटुंबाचा । काबाडी जाहला ॥ ५६ ॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला परमार्थीं विनोद । आंत मूढ मतिमंद । लोधला¹ कर्मीं ॥ ५७ ॥ सूकर पूजिलें विलेपनें । जैसा मर्दिला चंदनें । तैसा विषयी ब्रह्मज्ञानें । विवेकें बोधिला ॥ ५८ ॥ रासभें² उकरडां लोळे । तयास परिमळसोहळे । उलूक³ अंधारीं पळे । तया केवीं हंसपंगती ॥ ५९ ॥ तैसा विषयदरीचा बरांडी⁴ । घाली अधःपैतनीं उडी । तयास भगवंतीं आवडी । सत्संग कैंचा ॥ ६० ॥ वरती करून दांताळी । श्वानपुत्र हाडें चघळी । तैसा विषयी तळमळी । विषयसुखाकारणें ॥ ६१ ॥ तया श्वानमुखीं परमान्नं । मर्कटासि सिंहासन । तैसें विषयासक्तास ज्ञान । जिरेल कैचें ॥ ६२ ॥ रासभें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्यें प्रतिष्ठािला । न वचे तैसा अभक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३ ॥ मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षूनियां विष्टेचा गोळा । हंस म्हणवी ॥ ६४ ॥ तेसे सज्जनाचे संगतीं । विषयी सजन म्हण- विती । विषय अमेध्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५ ॥ कांखे घेऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥ ६६ ॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख । नरकीं प्राणी बरक । भोगिती स्वइच्छेनें ॥ ६७ ॥ वेश्येची करील सेवा । तो कैसा भली म्हणावा । तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवीं ॥ ६८ ॥ तैसे वि- षयी बापुडे । तयांस ज्ञान कोणीकडे । वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे जाहले ॥ ६९ ॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमध्यें कनिष्ठ । हीन अवि- वेकी आणि दुष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७० ॥ ऐसे जे कां पापरूप । दीर्घ- दोषी पापी वज्रलेप । तयांस प्रायश्चित्त अनुताप । उद्भवतां आहे ॥ ७१ ॥ तिहीं पुनः शरण जावें । सद्गुरूंसि संतोषावें । कृपादृष्टि जाहलिया व्हावें । पुन्हा शुद्ध ॥ ७२ ॥ स्वामिद्रोह जयास घडे । तो यावच्चंद्रसूर्य नरकीं पडे । तपास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचूनी ॥ ७३ ॥ स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें । तेणें गुणें उपतिष्ठिलें । नाहींच ज्ञान ॥ ७४ ॥ भाव आणिला जायाचाँ । मंत्र घेतला गुरूचा । १. लुब्ध झाला. २ गाढव. ३. बुबड. ४. आशाळभूत. ५. नरकांत. ६. दूध. ७. अपवित्र. ८. ब्रह्मानंद. ९. प्राप्त झालें. १०. उसना.