भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 145, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 145

जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३ ॥ दुःख पराचें नेणती । दुर्जन गांजिलेचि गांजिती । श्रम पावतां आनंदती । आपले मनीं ॥ ९४ ॥ स्वदुःखें झुरे अंतरीं । आणि परदुःखें हास्य करी । तयास प्राप्त यमपुरी । यमदूत झोडिती ॥ ९५ ॥ असो ऐसे मदांध बापुडे । तयांस भगवंत कैंचा जोडे । जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेकरूनी ॥ ९६ ॥ तयांस देहाच्या अंतीं । गात्रें क्षीणता पावती । जिवलगें वोसांडिती । जाणवेल तेव्हां ॥ ९७ ॥ असो ऐसे गुणा वेगळे । ते सच्छिष्य आगळे । दृढभावार्थे सो- हळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८ ॥ जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभि- मान पाठी लागे । ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९ ॥ जेणेंकरितां दुःख जाहलें । तेंचि मनीं सद्दढ धरीलें । तैणें गुणें प्राप्त झालें । दुःख विशेष ॥ १०० ॥ संसारसंगें दुःख न जाहलें । ऐसें देखिलें ना ऐकिलें । ऐसें जाणोनि अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १ ॥ संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती । जाणोनि डोळे झांकिती । ते पढतमूर्ख ॥ २ ॥ प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा । परमार्थ अ- वघाच बुडवावा । हें विहितें नव्हे ॥ ३ ॥ मागां झालें निरूपण । गुरुशि- ष्यांची ओळखण । आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके शिष्यलक्षणनिरूपणं नाम तृ- तीयः समासः ॥ ३ ॥

४. उपदेशलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधा कोणकोणें । सांगतां तें असाधारणें । परी कांहींएक सांगों ॥ १ ॥ बहुत मंत्र उपदे- शिती । कोणी नाममंत्र सांगती । एक ते जप करविती । ओंकाराचा ॥ २ ॥ शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र महालक्ष्मीमंत्र । अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३ ॥ मत्स्य कूर्म वराहमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र । भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४ ॥ भैरवमंत्र मल्हारिमंत्र । हनुमंतमंत्र यक्षिणीमंत्र । नारायणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती


१. कसाई. २. सोडून जातात. ३. कष्टी. ४. योग्य. ५. पुष्कळ.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 145, कुल 467 में से · BharatKosha