दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
DevanagariHindipublished467 पृष्ठ
पृष्ठ 146, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 146
॥ ५ ॥ शेषमंत्र गरुडमंत्र । वायुमंत्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणोनि सांगावे ॥ ६ ॥ बाळामंत्र बगळामंत्र । काळीमंत्र कंका- ळीमंत्र । बेडूकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७ ॥ पृथगोकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजांचे ॥ ८ ॥ पाहूं जातां पृथ्वीवरी । देवांची गणना करी । तितुके मंत्र वैखरी । किती ह्मणोनि वदावे ॥ ९ ॥ असंख्यात मंत्रमाळा । एकाहूनि एक आ- गळा । विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १० ॥ कित्येक मंत्रीं सुतें जाती । कित्येक मंत्रीं व्यथा नासती । कित्येक मंत्रीं उतरती । सितें³ विंचू विखार ॥ ११ ॥ ऐसे नानापरीचे मंत्रीं । उपदेशिती कर्णपात्रीं । जप ध्यान पूजा यंत्रीं । विधानयुक्त सांगती ॥ १२ ॥ एक शिव शिव सांगती । एक हरिहर म्हणविती । एक उपदेशिती । विठ्ठल विठ्ठल ह्मणोनि ॥ १३ ॥ एक सांगती कृष्ण कृष्ण । एक सांगती विष्णु विष्णु । एक नारायण नारायण । ह्मणोनि उपदेशिती ॥ १४ ॥ एक म्हणती अच्युत अच्युत । एक म्हणती अनंत अनंत । एक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५ ॥ एक सांगती राम राम । एक सांगती ओम् ओम् । एक म्हणती मेघश्याम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६ ॥ एक सांगती गुरु गुरु । एक सांगती परमेश्वरु । एक म्हणती विघ्नहरु । चिंतीत आवा ॥ १७ ॥ एक सां- गती सोमराज । एक सांगती गरुडध्वज । एक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८ ॥ एक सांगती देव देव । एक म्हणती केशव केशव । एक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९ ॥ एक विश्वनाथ म्हणविती । एक मल्हारी सां- गती । एक ते जप करविती । तुकाई तुकाई म्हणोनि ॥ २० ॥ हें किती म्हणोनि सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें । इच्छेसारिखें स्वभावें । उप- देशिती ॥ २१ ॥ एक सांगती मुद्रा चारी । खेचरी भूचरी चाचरी अगो- चरी । एक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२ ॥ एक दाखविती देखणीं । एक अनुहतध्वनी । एक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३ ॥ एक
१. अनेक प्रकारचे. २. वाणीनें. ३. हिंव. ४. रीतीसुद्धां. ५. शिव. ६. दृष्टि एकाग्र करण्याचें हठयोगांतील एक साधन. ७. हे मुद्रांचे चार प्रकार. ८. योग- मार्गांतील चौऱ्यायशीं आसनें. ९. चमत्कारिक देखावे. १०. शरीरांत स्वभावतः होत असलेला एक ध्वनि; अनाहतध्वनि. ११. देहासंबंधीं तात्त्विक ज्ञान.