भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 147, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 147

११२ श्रीदासबोध. [ दशक सांगती कर्ममार्ग । एक सांगती उपासनामार्ग । एक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥ २४ ॥ एक तपें सांगतीं । एक अजपाजप निरूपिती । एक तत्वें विस्तारिती । तत्वज्ञान ॥ २५ ॥ एक सांगती सगुण । एक निरूपिती निर्गुण । एक उपदेशिती तीर्थाटन । फिरत जावें ॥ २६ ॥ एक महावाक्य सांगती । त्याचा जप करावा म्हणती । एक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनि ॥ २७ ॥ एक शाक्तमार्ग सांगती । एक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती । एक इंद्रियें६ पूजन करविती । एक भावें ॥ २८ ॥ एक सांगती वशीकरण । स्तंभन मोहन उच्चाटन । नाना चेटकें आपण । स्वयें निरूपिती ॥ २९ ॥ ऐशी उपदेशाची स्थिती । पुरे जातां सांगों किती । ऐसे हे उपदेश असती । असंख्यात ॥ ३० ॥ ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेंविण निरर्थक । ये विषयीं असे एक । भगवद्वचन ॥ ३१ ॥ श्लोक ॥ नानाशास्त्रं पठँल्लोको नाना- दैवतपूजनम् । आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १ ॥ शैवशाक्ता- गमाद्या ये अन्ये च बहवो मताः । अपभ्रंशसमास्तेऽपि जीवानां भ्रांतिचेतसाम् ॥ २ ॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥ ३ ॥ टीका ॥ या कारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे आनं । यास्तव आधीं आत्मज्ञान । साधिले पाहिजे ॥ ३२ ॥ सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश । एतद्विषयीं जगदीश । बहुतां ठायीं बोलिला ॥ ३३ ॥ श्लोक ॥ यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् । तस्य दासस्य दासोऽहं भवे जन्मनि ज- न्मनि ॥ १ ॥ आत्मज्ञानाचा महिमा । नेणें चतुर्मुख ब्रह्मा । प्राणी बापुडा जीवात्मा । काय जाणे ॥ ३४ ॥ सकळ तीर्थांची संगती । ज्ञानदा- नांची फळश्रुती । त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५ ॥ १. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि या अष्ट अंगांनीं युक्त. २. शरीरांत सात चक्राकार रचना मानतात त्या. ३. श्वासो- च्छ्वासाबरोबर उमटणाऱ्या सोहं या ध्वनीचा जप. ४. तत्वमसि, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानं ब्रह्म, अहं ब्रह्मास्मि, हीं चार वेदांतील चार सारवाक्यें. ५. मनःपूत वर्तन. ६. इंद्रियांच्या देवता. ७. लोकांस वश करण्याचे मंत्र. ८. इंद्रियांचे व्यापार बंद पाडण्याचा मंत्र. ९. गांव वगैरे सोडून जाण्याची बुद्धि होईल असा मंत्र. १०. अन्य. ११. पुण्य.