भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 150, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 150

५ वा. ] शुद्धज्ञानलक्षण. ११५ जाणावें दुसऱ्याचे जीवींचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४ ॥ महानुभाव महा भला । मानसपूजा करितां चुकला । कोणी एकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५ ॥ ऐसी जाणे अंतरस्थि- ती । तयास परम ज्ञाता म्हणती । परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६ ॥ बहुत प्रकारांचीं ज्ञानें । सांगों जातां असाधारणें । सायुज्यप्राप्ती होय जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७ ॥ तरी तें कैसें आहे ज्ञान । कैसें समा- धानाचें लक्षण । ऐसें हें विशेद करून । मज निरूपावें ॥ ३८ ॥ ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिलिये समासीं निरूपिलें । श्रोतीं अवधान दीधलें । पाहिजे पुढें ॥ ३९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके बहुधा- ज्ञाननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. शुद्धज्ञानलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान । पाहावें आपणास आपण । या नांव ज्ञान ॥ १ ॥ मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप ओळखावें । नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २ ॥ जेथें दृश्यप्रकृति सरे । पांचभौतिकें हें वोसरे । समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३ ॥ मनोबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उल्लेखें परहून पर । या नांव ज्ञान ॥ ४ ॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान । विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५ ॥ सर्वसाक्षिणी अवस्था तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६ ॥ दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जा- णिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७ ॥ जेथें सर्वचि नाहीं ठायींचें । तेथें सर्व- साक्षित्व कैंचें । म्हणोनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८ ॥ ज्ञान म्हणजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणोनि शुद्ध ज्ञान तें सतत । वेगळेंचि असे ॥ १. पुष्कळ. २. स्पष्ट. ३. दिसणारें मायामय जग. ४. पंचभूतांचा विस्तार. ५. भेदबुद्धि. ६. मनास व बुद्धीस अगम्य. ७. जाणीव. ८. परा वाणीच्याही पली- कडील, शब्दातीत. ९. जगाचा भास. १०. एक समाधीचा प्रकार; यांत, मी जड नव्हे जडाचा साक्षी आहे, हा मनाचा निश्चय असतो. ११. अखंड एकरूपता.