भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 151, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 151

११६ श्रीदासबोध. [ दशक ९ ॥ ऐसें शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपींच आपण । या नांव स्वरूप- ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ महावाक्य उपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला । तेथींचा तो विचार केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥ महा- वाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार । न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥ महावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां । त्याचा जप करितां । वृथा शिण होय ॥ १३ ॥ महावाक्याचें विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुचि आहे ॥ १४ ॥ आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुर्लभ । जें आदि अंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५ ॥ जेथूनि हें सर्वहि प्रगटे । आणि सक- ळहि जेथें आँटे । तें ज्ञान झालिया फिटे । भ्रांतिबंधन ॥ १६ ॥ मतें आणि मतांतरें । जेथें होतीं निर्विकारें । अति सूक्ष्म विचारें । पाहतां ऐक्य ॥ १७ ॥ जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ । वेदांत मतें ॥ १८ ॥ शोधितां आपुलें मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान । या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायक ॥ १९ ॥ आपणासि ओळखों जातां । अंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें एकदेशी वार्ता । निःशेष उडे ॥ २० ॥ मी कोण ऐसा हेत । धरूनि पाहतां देहाँतीत । अवलोकितां नेमस्त । स्वरू- पचि होय ॥ २१ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार । पावले ते साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ व्यास वसिष्ठ महामुनी । शुक नारद समा- धानी । जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥ वामदेवाद्यिकयोगी- श्वर । वाल्मीक अत्रि ऋषीश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांत मतें ॥ २४ ॥ सनकादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणिक बोलतां वचनीं । अगाध असती ॥ २५ ॥ सिद्ध मुनि महानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें महादेव । डुलतो सदा ॥ २६ ॥ जें वेदशास्त्राचें सार । सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भावानुसार । भाविकांसि होय ॥ १. ब्रह्म. २. ज्या संबंधानें कांहीं बोलतां येतें तो पदार्थ वाच्यांश होय, व जो त्या पदार्थासंबंधीं कांहीं बोलतो पण ज्याचेसंबंधीं कांहीं बोलण्याला त्याहून अन्य कोणी नाहीं, तो लक्ष्यांश, -या विचाराच्या योगें. ३. स्वतःसिद्ध. ४. लय पावतें. ५. निर्द्वंद्व. ६. जीव व जड पदार्थ या दोहोंचें. ७. देहाहून भिन्न. ८. मत्स्येंद्रनाथ.