दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 152, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा.] शुद्धज्ञानलक्षण. ११७ २७ ॥ साधु संत आणि सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य- ज्ञान । सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्र- पानें । पंचाग्नि गोरांजनें १ । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥ सकळ साधनांचें फळ । ज्ञानचि सांगें केवळ । जेणें संशयाचें मूळ । निःशेष तुटे ॥ ३० ॥ छप्पन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुनि वेदांत । या इतुक्यांचा गहनार्थ । एकचि असे ॥ ३१ ॥ जें नेणवे पुराणीं । जेथें शिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येच क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥ पाहिलें नसतां संस्कृतीं । रीग नाहीं महाराष्ट्र ग्रंथीं । हृदयीं वसिल्या कृपामूर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३ ॥ आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदयीं वसे ॥ ३४ ॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रयत्नेविण सुरस । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥ ग्रंथमात्र महाराष्ट्र । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामध्यें श्रेष्ठ । थोर तो वेदान्त ॥ ३६ ॥ त्या वेदान्तापारतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाहीं । जेथें वेदगर्भ ३ सर्वही । प्रगट जाहला ॥ ३७ ॥ असो ऐसा जो वेदान्त । त्याचाचि मथितार्थैं २ । अति गहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८ ॥ अरे गहनाचेंहि गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन । सद्गुरुवचनें समाधान । नेमैस्त ५ आहे ॥ ३९ ॥ सद्गुरुवचन तोचि वेदान्त । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत ४ । सप्रचीत आतां ॥ ४० ॥ जें अत्यंत गहन । माझे स्वामीचें वचन । जेणें माझें समाधान । अत्यंत जाहलें ॥ ४१ ॥ तें हें माझे जीवींचें गुज । मीं सांगेन म्हणतों तुज । जरी अवधान देशी मज । तरी आतां येच क्षणीं ॥ ४२ ॥ तंव शिष्य म्लानवदनें बोले । धरिलीं सद्दढ पाऊलें । मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥ अहंब्रह्मास्मि ६ महावाक्यें । तेथींचा अर्थ अतर्क्य । तोहि सांगतों ऐक्यें ७ । गुरुशिष्यें जेथें ॥ ४४ ॥ ऐक शिष्या येथींचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । येविषयीं संदेह भ्रम । धरूंच नको ॥ ४५ ॥ नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें क- थन । कीजेल आतां ॥ ४६ ॥ निर्माण पंचभूतें इंद्रियें । कल्पांतीं नासती १. स्वतःला जाळून घेणें. २. सार. ३. वेदांचा सारांश. ४. निर्णय. ५. खचित. ६. मी ब्रह्म आहें. (हें यजुर्वेदांत आहे.) ७. गुरुशिष्यांच्या मनांचें ऐक्य.