दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 155, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें॥ ६॥ भक्त ज्ञाता तापसी । योगी वीतरागी संन्यासी । पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥ न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्मा- धर्म । न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८ ॥ तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र । सन्मार्ग जो कां पवित्र । तोहि न दिसे ॥ ९ ॥ न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार । न कळे कैसा परोपकार । दान पुण्य ॥ १० ॥ नाहीं पोटीं भूतदया । नाहीं शुचिष्मंत² काया । नाहींच जनांसि निववावया । वचन मृदु ॥ ११ ॥ न कळे भक्ती न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान । न कळे मोक्ष न कळे साधन । या नांव बद्ध ॥ १२ ॥ न कळे देव निश्चयात्मक । न कळे संतांचा विवेक । न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३ ॥ न कळे परमार्थाची खुण । न कळे अध्यात्मनिरूपण । न कळे आप- णासि आपण । या नांव बद्ध ॥ १४ ॥ न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनांचें फळ । न कळे तत्व केवळ । या नांव बद्ध ॥१५॥ न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण । न कळे वस्तु³ विलक्षण । या नांव बद्ध ॥१६॥ न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला । न कळे संकल्पें⁴ बांधिला । या नांव बद्ध ॥ १७ ॥ जयास नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण । तीर्थे व्रतें दान पुण्य । कांहींच नाहीं ॥१८॥ दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मैत्री नाहीं । शांति नाहीं क्षमा नाहीं । या नांव बद्ध ॥ १९ ॥ जें ज्ञानाविषयीं उणें । तेथें कैंचीं ज्ञानाचीं लक्षणें । बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २० ॥ नानाप्रकारचे दोष । करितां वाटे परम संतोष । बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१ ॥ बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद । बहु द्वंद्वे⁵ बहु खेद । या नांव बद्ध ॥२२॥ बहु दर्प बहु दंभ । बहु विषय बहु लोभ । बहु कर्कश बहु अशुभ । या नांव बद्ध ॥ २३ ॥ बहु ग्रामणी⁶ बहु मत्सर । बहु असूया⁷ तिरस्कार । बहु पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४ ॥ बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा⁸ । बहु कुकर्मांचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५ ॥ बहु
१. वैराग्यशील. २. शुद्ध. ३. जिचें लक्षण करितां येत नाहीं अशी वस्तु; ब्रह्म. ४. चित्तेनें. ५. कलह. ६. हरामखोरी. ७. मत्सर. ८. निरर्थक कल्पना.