दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 156, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा. ] बद्धलक्षण. १२१ कापट्य वादविवाद । बहु कुतर्क भेदाभेद । बहु क्रूर कृपामंद । या नांव बद्ध ॥ २६ ॥ बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिलाष । बहु प्रका- रींचे दोष । या नांव बद्ध ॥२७॥ बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट ऐकाकार । बहु अनीति अविचार । या नांव बद्ध ॥ २८ ॥ बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी । बहु तपिल्लें कुविद्या अनेकीं । या नांव बद्ध ॥२९॥ बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनअर्थी । बहु डॉईक दुर्मती । या नांव बद्ध ॥ ३० ॥ बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना । बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥३१॥ बहु विकल्पी बहु विषादी । बहु प्रपंची बहु उपाधी । बहु कुविद्येची बुद्धी । या नांव बद्ध ॥ ३२ ॥ बहु वाचाळ बहु पाषांडी । बहु दुर्जन बहु थोतांडी । बहु पैशून्य बहु खोडी । या नांव बद्ध ॥ ३३ ॥ बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम । बहु विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४ ॥ बहु कृपण बहु खंदेस्ती । बहु अदेखेणा बहु मस्ती । बहु असत्क्रिय अव्यवस्थी । या नांव बद्ध ॥ ३५ ॥ परमार्थविषयीं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान । नेणे स्वयें समाधान । या नांव बद्ध ॥ ३६ ॥ परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर । संसारभार जोजार । या नांव बद्ध ॥ ३७ ॥ सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी । देहबुद्धीची घातली बेडी । या नांव बद्ध ॥३८॥ हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥३९॥ नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी । चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४० ॥ काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण । द्रव्य दारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥४१॥ इंद्रियें करूनि निश्चळ । चंचळ होऊं नेदी पळ । द्रव्य दारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥ ४२ ॥ द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ । द्रव्य दारा सकळ स्वार्थ । या नांव बद्ध ॥४३॥ व्यर्थ जाऊं नेदी काळ । संसार- चिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४ ॥ नाना १. ऐकेखोर. २. घातकी. ३. तापट. ४. अनर्थ करणारा. ५. दावा धरणारा. ६. उठाठेवी. ७. चहाडी करणें. ८. अविश्वास. ९. अज्ञान. १०. चांचल्य. ११. सुस्तपणा. १२. दांडगाई. १३. मत्सरी. १४. स्थूल देह म्हणजे मी, अशा भावनेची.