दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 157, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२२ श्रीदासबोध. [ दशकं चिंता नाना उद्वेग । नाना दुःखांचे संसर्ग । करी परमार्थाचा त्याग । या नांव बद्ध ॥ ४५ ॥ घटिका निमेष पळभरी । दुश्चित नव्हतां अंतरीं । सर्व- काळ ध्यान धरी । द्रव्य द्वारा प्रपंचाचें ॥ ४६ ॥ तीर्थयात्रा दान पुण्य । हरिकथानिरूपण । मंत्र पूजा जप ध्यान । सर्वहि द्रव्य द्वारा ॥ ४७ ॥ जागृतीं स्वप्नीं रात्रंदिवस । ऐसा लागला विषयीं ध्यास । नाहीं क्षणाचा अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८ ॥ ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षुपणीं पालटे जाण । ऐक तेहि वोळखण । पुढिले समासीं ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके बद्धलक्षणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. मुमुक्षुलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें । जयाचें मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १ ॥ ऐसा प्राणी जो कां बद्ध । संसारीं वर्ततां अबद्ध १ । तयास प्राप्त झाला खेद । काळांतरीं ॥ २ ॥ संसार- दुःखें दुखवला । त्रिविध तापें पोळला । निरूपणें २ पालटला । अंतर्यामीं ॥ ३ ॥ झाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास । ह्मणे आतां पुरे सोस । संसाराचा ॥ ४ ॥ प्रपंच जाईल सकळ । एथील श्रम तो निष्फळ । आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५ ॥ ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं अवस्था ३ लागली । ह्मणे माझी वयसा ४ गेली । व्यर्थच अवघी ॥ ६ ॥ पूर्वी नाना दोष केले । ते अवघेच आठवले । पुढें येउनि उभे ठेले । अंत- र्यामीं ॥ ७ ॥ आठवे यमाची यातना । तेणें भयचि वाटे मना । नाहीं पापाची गणना । म्हणोनियां ॥ ८ ॥ नाहीं पुण्याचा विचार । झाले पापाचे डोंगर । आतां दुस्तर हा संसार । कैसा तरूं ॥ ९ ॥ आपले दोष आच्छा- दिले । भल्यांस गुणदोष लाविले । देवा म्यां व्यर्थची निंदिले । संत साधु सज्जन ॥ १० ॥ निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले विशेष । माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११ ॥ नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला ५ भगवंत । नाहीं अतीत अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२ ॥ नाहीं कष्टविलें शरीर । नाहीं केला परोपकार । नाहीं राखिला आचार । काममदें १. स्वैर. २. उपदेशानें. ३. आस्था. ४. वय. ५. पूजिला.