भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 159, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 159

१२४ श्रीदासबोध. [ दशक ३२ ॥ म्हणे मी कांहींच नेणें । म्हणे मी सकळांहूनि उणें । आपलीं वर्णी कुलक्षणें । या नांव मुमुक्षु ॥ ३३ ॥ म्हणे मी कुश्चिळ¹ अघोरी । म्हणे मी नीच नानापरी । म्हणे मी अनधिकारी । या नांव मुमुक्षु ॥ ३४ ॥ म्हणे मी काय आपस्वार्थी । म्हणे मी काय अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी । या नांव मुमुक्षु ॥ ३५ ॥ म्हणे मी अवगुणांची राशी । म्हणे मी कुकर्मी आळशी । म्हणे मी भार झालों भूमीशीं । या नांव मुमुक्षु ॥ ३६ ॥ आप- णास निंदी सावकाश । पोटीं संसाराचा त्रास । धरीं सत्संगाचा हव्यास । या नांव मुमुक्षु ॥ ३७ ॥ नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि² साधनें केलीं । नाना ग्रंथांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८ ॥ तेणें नव्हे समाधान । वाटे अवघाच अनुमान । म्हणे रिघूं संतांस शरण । या नांव मुमुक्षु ॥ ३९ ॥ देहाभिमान कुलाभिमान । द्रव्याभिमान मानाभिमान । सांडूनि संतचर- णीं ³अनन्य । या नांव मुमुक्षु ॥ ४० ॥ अहंता सांडूनि दुरी । आपणासी निंदी नानापरी । मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्षु ॥ ४१ ॥ ज्याचें मन थोरपणा लाजे । जो परमार्थाकारणें झिजे । संतपायीं विश्वास उपजे । या नांव मुमुक्षु ॥ ४२ ॥ स्वार्थ सांडूनि प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा । अंकितें⁴ होईन सज्जनांचा । या नांव मुमुक्षु ॥ ४३ ॥ ऐसा मुमुक्षु जाणिजे । संकेतचिन्हें⁵ ओळिखिजे । पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके मुमु- क्षुलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. साधकलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां मुमुक्षूचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥ अवगुणांचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥ जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ॥ ३ ॥ उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें १. अमंगळ. २. मन व इंद्रियें यांस जिंकणें. ३. एकनिष्ठ. ४. दास. ५. संक्षेपतः.