भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 160, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 160

५ वा. ] सार्थकलक्षण. १२५ करी साधन । या नांव साधन ॥ ४ ॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैत- निरूपणाची गोडी । मननें अर्थांतर¹ काढी । या नांव साधक ॥ ५ ॥ होतां सारासार विचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तर² । आत्मज्ञान पाहे ॥ ६ ॥ नानासंदेहनिवृत्ती³ । व्हावया धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरु- प्रतीती । ऐक्यतेसि आणि ॥ ७ ॥ देहबुद्धी विवेकें वारी । आत्मबुद्धी दृढ धरी । श्रवण मनन केलेंच करी । या नांव साधक ॥ ८ ॥ विवंचूनि⁴ दृश्य- भान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥ ९ ॥ तोडूनि द्वैताची उपाधी⁵ । अद्वैतवस्तु⁶ साधनें साधी । लावी ऐक्य- तेची समाधी । या नांव साधक ॥ १० ॥ आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११ ॥ उत्तम साधूचीं लक्षणें । अंगिकारी निरूपणें । बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव साधक ॥ १२ ॥ असत्क्रिया ते सोडिली । आणि सत्क्रिया ते वाढविली । स्वरूपस्थिति⁷ बळावली । या नांव साधक ॥ १३ ॥ अवगुण त्यागी दिवसें- दिवस । करी उत्तम गुणांचा अभ्यास । स्वरूपीं लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४ ॥ दृढनिश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडले⁸ । सदा स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५ ॥ प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष्य⁹ वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६ ॥ जें या जनास चोरलें । मनासि न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ॥ १७ ॥ जें बोलतांच वाचा धेरी¹⁰ । जें पाहतांचि अंध करी । तेंचि साधी नानापरी । या नांव साधक ॥ १८ ॥ जें साधूं जातां साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवें आणि मना । या नांव साधक ॥ १९ ॥ जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे । तेंचि अनुभवा आणि बळें । या नांव साधक ॥ २० ॥ स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लाघवेंगे । तेचि वस्तु होय अंगें । या नांव साधक ॥ २१ ॥ अनुभवाचीं अंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नसोनि असणें ।

१. अर्थांतील मर्म. २. दृढतर, निश्चयात्मक. ३. शंकांचें निवारण. ४. मनन करून. ५. संबंध. ६. ब्रह्म. ७. स्वरूपासंबंधीं जागृति. ८. भासत नाहीं. ९. अचिंत्य ब्रह्म. १०. कुंठित करितें.