भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 161, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 161

१२६ श्रीदासबोध. [ दशक या नांव साधक ॥ २२ ॥ परती सारूनि उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३ ॥ देवभक्तांचें मूळ । शोधूनि पाहे सकळ । साध्यचि होय तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥ विवेकबळें गुप्त झाला । आपेंआप मावळला । दिसतो परी देखिला३ । नाहींच कोणीं ॥ २५ ॥ मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणासि धुंडिलें । तुर्येसहित ओलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढें उन्मनींच्या४ शेवटीं । आपली आपणास अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७ ॥ द्वैताचा तडका तोडिला । भासाचा भासें मोडिला । देहीं असोनि विदेही झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेह निवृत्ती । या नांव साधक ॥ २९ ॥ पंचभूतांचा विस्तार । जयास वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३० ॥ स्वप्नीं भय जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें । सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ मायेचें जें प्रत्यक्षपण जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥ निद्रा सांडूनि चेईंरा६ झाला । तो स्वप्नभयापासोनि सुटला । माया सांडूनि तैसा गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिति बाणली । बाह्य निस्पृह- ता अवलंबिली । संसारउपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४ ॥ कामापासोनि सुटला । क्रोधापासोनि पळाला । मदमत्सर सांडिला । एकी- कडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेसी लाजविलें । परमा- र्थासी माजविलें । विवेकबळें ॥ ३६ ॥ अविद्येपासुनि फडकला । प्रपंचा- पासोनि निसटला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥ थोरपणा- सि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८ ॥ मेदाचा मडघां९ मोडिला । अहंकार झोडूनी पाडिला । पायीं ध- रूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधू । थोपै मारिला भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४० ॥ भवभयासि १. मायेचा संबंध. २. देह दिसतो. ३. तो स्वतः दिसत नाहीं. ४. निर्विकल्प समाधि; एथें मनाचा लय होतो. ५. कल्पना. ६. जागृत. ७. लाथ मारिली ८. शिडकारिलें. ९. बिऱ्हाड. १०. चापट, थापड.