भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 164, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 164

५ वा.] सिद्धलक्षण. १२९ सर्वांमध्यें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥ संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन खोटें । निष्फळ होय ॥ १५ ॥ व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव । व्यर्थ संशयाचा स्वभाव । निश्चयेंविण ॥ १६ ॥ व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ । व्यर्थ संशयाचा परमार्थ । निश्चयेंविण ॥ १७ ॥ व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ संशयाची प्रीती । व्यर्थ संशयाची संगती । संशय वाढवी ॥ १८ ॥ व्यर्थ संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९ ॥ व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती । व्यर्थ संश- याची गती । निश्चयेंविण ॥ २० ॥ व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ संशयाचा पक्ष । व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥ व्यर्थ संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित । व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण ॥ २२॥ व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता १। व्यर्थ संशयाचा ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥ निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं । व्यर्थचि पडिले प्रवाही । संदेहाचे ॥ २४ ॥ निश्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचालपणें । निरर्थक ॥ २५ ॥ असो निश्चयेंविण जे वलगना । ते अवघी विटंबना । संशयैं कांहीं समाधाना । उरी नाहीं ॥ २६ ॥ म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान । तेंचि सिद्धांचें लक्षण । निश्चयेंेंसी ५॥ २७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय करावा कवण । मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८ ॥ ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवांचा वेळसा । करूं चि नये ॥ २९ ॥ जेणें निर्मिलें चराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें परमेश्वर । वोळखावा ॥ ३० ॥ मुख्य देव तो कोण । भक्ताचें कैसें लक्षण । असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥ आपल्या देवास वोळ- खावें । मग मी कोण हें पाहावें । संग त्यागून राहावें । वस्तुरूप ॥ ३२ ॥ तोडावा बंधनाचा संशय । करावा मोक्षाचा निश्चय । पहावा भूतांचा अ- न्वय । व्यतिरेक ॥ ३३ ॥ पूर्वपक्षेंसीं सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत । मग पावावा निवांत । निश्चय देवाचा ॥ ३४ ॥ देहाचेनि योगें संशय । १. विद्वत्ता. २. घोटाळा.