दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 165, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३० श्रीदासबोध. [ दशक करी समाधानाचा क्षय । तरी चळों न द्यावा निश्चय । आत्मत्वाचा ॥ ३५॥ सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान । आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६ ॥ आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी । या कारणें आत्मबुद्धी । सदृढ धरावी ॥ ३७॥ आत्मबुद्धि निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची । अहमात्मा १ हें कधींचि । विसरूं नये ॥ ३८ ॥ निरू- पिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसि गेलिया शरण । संशय तुटती ॥ ३९ ॥ आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें । मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४० ॥ सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहा हो । निःसंदेही ॥ ४१ ॥ देहसंबं- धाचेनि गुणें । लक्षणांसि काय उणें । देहातीतांचीं २ लक्षणें । काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२ ॥ जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं । निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंचीं ॥ ४३ ॥ लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठायींच निर्गुण । तेंचि सिद्धाचें लक्षण । वस्तुरूपें ॥ ४४ ॥ तथापि ज्ञानदशकीं ३ बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यूनपूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमद- शके सिद्धलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७२. दशक सहावा. १. देवशोधन. श्रीगणेशाय नमः ॥ चित्त सूचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमेष एक ॥ १ ॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणाशीं । न भेटतां तेथिल्या प्रभूशीं । सौख्य कैंचें ॥ २ ॥ म्हणोन ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय श्लाघ्यवाणें ४ । सर्व कांहीं ॥ ३ ॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता । आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥ म्हणोन रायापासून रंक । कोणी एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥ त्यास १. मी आत्मा आहें, देह नव्हे. २. देहाहंभाव गळलेल्या साधूंचीं. ३. आठव्या दशकांत. ४. चांगलें.