भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 166, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 166

६ वा.] देवशोधन. १३९ न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६ ॥ या कारणें जो शाहणा । तेणें प्रभूस भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्या- हून थोर देशाधिपती । देशाधिपतीहून नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥ राष्ट्रा- चा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजाचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९ ॥ एक नरपति एक गजपति । एक हयपति एक भूपती । सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजु ॥ १० ॥ असो ऐसिया समस्तां । एक ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसि निर्मिता तोचि थोर । तो वोळखावा परमेश्वर । नाना यत्नें ॥ १२ ॥ तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना । ब्रह्मां- डनायक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥ जेणें संसारीं घातलें । अवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासि नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥ म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग धरावा । म्हणजे कळे ॥ १५ ॥ जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६ ॥ चलेना डलेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधु ॥ १७ ॥ जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥ जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥ पोट भरावयाकारणें । ना- ना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २० ॥ देव वोळखावा एक । तेंचि ज्ञान तेंचि सार्थक । येर अवघेंचि निरर्थक । पोटविद्या ॥ २१ ॥ जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें । पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥ एवं पोट भरायाची विद्या । तयेसि म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३ ॥ ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्ञान । तयापाशीं समा- धान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥ अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांप- १. वेठीस. २. सार्वभौम. ३. हातीं येईना. ४. जाणवेना. ५. थोर पुरुष. ६. याप्रकारें. ७. प्रत्यक्ष.