दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 167, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३२ श्रीदासबोध. [ दशक देल ज्ञान । करंट्यास करंट्याचे दर्शन । होतां भाग्य कैचें ॥ २५ ॥ रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्ब- ळाला । पाठीं कैची ॥ २६ ॥ पिशाच्चापाशीं पिशाच्च गेलें । तेथें कोण सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवण ॥ २७ ॥ भिकाऱ्यापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैचा ॥ २८ ॥ अबुद्धापाशीं गेला अबुद्ध । तो कैसेनि होईल सुबुद्ध । बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥ देह्यापाशीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही⁶ । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञान- मार्ग ॥ ३० ॥ या कारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासार- विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. ब्रह्मप्रतिपादन. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें । नानामतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥ ब्रह्मज्ञानाविण उपदेश । तो म्हणों नये विशेष । धान्याविण जैसें भूस । खातां नये ॥ २ ॥ नाना काबांड बडविलें । ना तरी तकचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें । सावकाश ॥ ३ ॥ नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या । खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैसा ॥ ४ ॥ तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना उपदेशांचा शिण । सार सांडून असार कोण । शाहणा सेवी ॥ ५ ॥ आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण । श्रोतेजनीं ॥ ६ ॥ सकळ सृष्टीची रचना । तें हें पांचभौतिकें जाणा । परंतु हें तगेना । सर्वकाळ ॥ ७ ॥ आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । येर पांचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८ ॥ येरवीं हीं पाहतां भूतें । देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यातें । विषाद वाटे ॥ ९ ॥ मौं तों जगन्नायक परमात्मा । त्यासि आणि भूत उपमा । ज्याची कळेना महिमा । १. आधार. २. वेड्यास. ३. काळोख्याचे दिवसांत. ४. अज्ञानी. ५. संसारी. ६. मुक्त. ७. उपदेश. ८. पाहणें. ९. पाचोळा. १०. जड सृष्टि. ११. मग.