भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 168, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 168

ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥ भूतांऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष या कारणें महापुरुष । सर्व जाणती ॥११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । १ यां सबाह्यें जगदीश । पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी ॥ १२ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥१३॥ पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥१४॥ तें हें दृश्य नाश- वंत । ऐसें वेदश्रुती बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥१५॥ जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें २ जाळितां जळेना । जें कालवितां काल- वेना । आपैंकरूनी ३ ॥ १६ ॥ जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना ४ झडेना । जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥१७॥ ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वां- हूनि ॲनारिसें ५ । परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ दिसेना तरी काय झालें । परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९ ॥ दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें । परंतु गुज तें जाणावें । गौप्य आहे ॥२०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार । गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ उमजेना तें उमजवावें । दिसेना तें पाहावें । जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥२२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें । कॉनडेंचि ६ अभ्यासावें । सावकाश ॥ २३ ॥ वेद विरंची ७ आणि शेष । जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म ॥ २४ ॥ तरी तें कोण परिसावें । तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥२५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे । वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त ८ तें ॥ २६ ॥ तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥ ऐसा देवाचा निश्चय झाला । देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणाचि आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥ माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि होतो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥२९॥ पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्व झाडितां सार ।


१. अंतर्बाह्य. २. अग्नीनें. ३. उदकानें. ४. अथवा. ५. निराळें. ६. अवघड तेंच. ७. ब्रह्मदेव. ८. अदृश्य.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 168, कुल 467 में से · BharatKosha