दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 171, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३५ श्रीदासबोध. [ दशक यासी ॥ २२ ॥ आपला आपण शोध घेतां । आपली तों मायिक वार्तां । तत्त्वांतीं उरलें तत्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३ ॥ आपणाविणें निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म । तत्वासरीसों गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४ ॥ मीपण पाहतां आढळना । निर्गुण ब्रह्म तें चलेना । आपण तेंचि परी कळेना । सद्गुरूविण ॥ २५ ॥ सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें । पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६ ॥ आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळां- मध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७ ॥ होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विसर । ठायीं पडे ॥ २८ ॥ आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण । मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९ ॥ झालिया तत्त्वांचें निर- सन । निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण । तत्वनिरसना- उपरि ॥ ३० ॥ तत्त्वांमध्ये मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहं- भावें प्रत्यया आलें । आत्मैनिवेदन ॥ ३१ ॥ आत्मनिवेदन होतां । देव- भक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२ ॥ निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पापपुण्य । निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३ ॥ तत्त्वीं वेंटाळूनी घेतला । प्राणी संशय्ये गुंडाळला । आपणास आपण भुलला । कौहं म्हणे ॥ ३४ ॥ तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सौहं । अनन्य होतां अहं सोहं । माव- ळलीं ३५ ॥ याउपरी उर्वरितें । तेंचि सत्स्वरूप संत । देही असोनि देहा- तीत । जाणिजे ऐसा ॥ ३६ ॥ संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे । आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भावनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. ब्रह्मनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र । त्रेतायुग १. तत्त्वांच्या निरसनावरोबर. २. देव म्हणजे मीच, या भावनेनें. ३. आत्म- रूपाचें ज्ञान. ४. मी कोण आहे ? ५. तो देवच मी. ६. बाकी राहिलेलें.