भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 172, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 172

बारा लक्ष शहाण्णव सहस्त्र । द्वापर आठ लक्ष चौसष्ट सहस्त्र । आतां कलियुग ऐका ॥ १ ॥ कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्त्र । चतुर्युगें बेचाळीस लक्ष वीस सहस्त्र । ऐशीं चतुर्युगें सहस्त्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २ ॥ ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णु सहस्त्र होतां ऐका । पळ एक ईश्वराचें ॥ ३ ॥ ईश्वर जाय सहस्त्रवेळ । तें शक्तीचें अर्ध पळ । ऐसी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४ ॥ ऐशा अनंत शक्ति होती । अनंत रचना होती जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ॥ ५ ॥ परब्रह्मासि कैची स्थिती । परी ही बोलावयाची रीती । वेदश्रुती नेतिनेती¹ परब्रह्मीं ॥ ६ ॥ चार सहस्त्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहटी² । उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७ ॥ चार लक्ष सत्तावीस सहस्त्र । दोनशें चाळीस संवत्सर । पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८ ॥ ऐसे रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर । पाहतां येथील विचार । अंत न लागे ॥ ९ ॥ एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर । एक म्हणती शक्ति³ थोर । सकळांमध्ये ॥ १० ॥ ऐसे आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं । यद्दृष्टं तन्नष्टं⁴ हे श्रुती । बोलतसे ॥ ११ ॥ आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां । याचा निश्चय निवडेना । साधूविण ॥ १२ ॥ साधु निश्चय करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक । येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३ ॥ चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना । हें कां तुम्ही विचाराना । आपुले ठायीं ॥ १४ ॥ स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरहि कल्पिलें । परंतु जागें झालिया झालें । कैसें पाहा ॥ १५ ॥ पाहतां जागृतीचा विचार । कैचें लहान कैचें थोर । झाला अवघा विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६ ॥ अवघाचि मायिक विचार । कैचें लहान कैचें थोर । लहानथोर हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७ ॥ जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतांच मेला । परी याचा विचार राहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८ ॥ जयांस झालें आत्मज्ञान । तेचि थोर महाजन । वेदशास्त्रपुराण । साधु संत बोलिले ॥ १९ ॥ एवं सकळांमध्यें


तळटीपा (Footnotes): १. हें ब्रम्ह नव्हे, तें ब्रम्ह नव्हे, असें सांगतात; हें ब्रम्ह होय, असें सांगत नाहींत. २. मर्यादा ३. देवी. ४. जें दिसतें तें नाशवंत.