दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 173, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३८ श्रीदासबोध. [ दशक थोर । तो एकचि परमेश्वर । तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २० ॥ तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार । स्थानमानांचा विचार । ऐलीकडे ॥ २१ ॥ नांव रूप स्थान मान । हा तो अवघाचि अनुमान । तथापि होईल निदानें १ । ब्रह्मप्रलेंयीं २ ॥ २२ ॥ ब्रह्म प्रलयावेगळें । ब्रह्म नांव- रूपा वेगळें । ब्रह्म कोणी एका काळें । जैसें तैसें ॥ २३ ॥ करिती ब्रह्मनिरू- पण । जाणती ब्रह्म संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. मायाब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें । श्रोत्या- वक्त्याचे मिषें । निरूपण ऐका ॥ १ ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥२॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ । ब्रह्म निरूपाधि केवळ । माया उपाधिरूप ॥ ३ ॥ माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना । माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४ ॥ माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना । माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५ ॥ माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना । माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६ ॥ माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना । माया विटे ब्रह्म विटेना । अवित तें ॥ ७ ॥ माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया करी ब्रह्म कांहींच न करी । माया नानारूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८ ॥ माया पांचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक । मायाब्रह्माचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९ ॥ माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार । माया अंत३ पारावार । ब्रह्मास नाहीं ॥ १० ॥ सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिति आच्छादिली । परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११ ॥ गों- डाळें सांडून नीरें घेइजे । नीर सांडून क्षीरं सेविजे । माया सांडून अनु- १. शेवट. २. ब्रह्मदेवाचीं शंभर वर्षे भरलीं म्हणजे होणाऱ्या प्रलयांत. ३- मर्यादित. ४. पाण्याच्या पृष्ठावर वाढणारी एक वनस्पती. ५. पाणी. ६. दूध.