भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 175, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 175

१४० श्रीदासबोध. [ दशक माझी आशंका फेडावी । ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २ ॥ आतां ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर । वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला ॥ ३ ॥ जीवंभूतः सनातनं । ऐसें गीतेचें वचन । येणें वाक्यें सत्यपण सृष्टीस आलें ॥ ४ ॥ यद्दृष्टं तन्नष्टं येणें । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें । सत्य मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५ ॥ सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों तरी दिसे । आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६ ॥ सृष्टीमध्यें बहु जन । अज्ञान आणि सज्ञान । म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७ ॥ ऐका अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत । देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ ८ ॥ बोले सर्वज्ञाचा राजा । मूर्खस्यै प्रतिमापूजा । ब्रह्मप्रलया- च्या पैजा । घालूं पाहे ॥ ९ ॥ तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी संध्या स्नान । गुरुभजन तीर्थाटण । कासया करावें ॥ १० ॥ श्लोक ॥ तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः । वादे वादे जायते तत्व- बोधो बोधे बोधे भासते चंद्रचूडः ॥ १ ॥ ऐसें चंद्रचूडाँचें वचन । सद्गु- रूचें उपासन । गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११ ॥ गुरुसि कैसें भजावें । आधीं तयासि ओळखावें । त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें ॥ १२ ॥ श्लोक ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १ ॥ गुरुगीतेचें वचन । ऐसें सद्गुरूचें ध्यान । तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३ ॥ ऐसें सज्ञान बोलिला । सद्गुरु तो वोळखिला । सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चिताथै ॥ १४ ॥ श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवाद । म्हणे कैसा रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५ ॥ जीवभूतः सनातनै । ऐसें गीतेचें बचन । तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६ ॥ ऐसा श्रोता आक्षेप करी । विषाद् मानिला अंतरीं । याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें ॥ १७ ॥ गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद । म्हणोनियां. व्यर्थ खेद । वाहतोसी ॥ १८ ॥ श्लोक ॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां...॥ टी० ॥ १. जीव हा माझा अंश असून शाश्वत आहे. २. दिसतें तितकें नाहींसें होतें. ३. मूर्खानें प्रतिमेची पूजा करावी. ४. शिवाचें. ५. संशयाचें निरसन. ६. शंका.