दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 176, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें६ वा. ] सृष्टिकथन. १४१ माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ । वृक्ष तोडितां तात्काळ । तुटत आहे ॥ १९ ॥ श्लोक ॥ नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥ २ ॥ टीका ॥ शस्त्रांचेनि तुटेना । अग्नीचेनि जळेना । उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २० ॥ पिंपळ तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें । पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत ॥ २१ ॥ तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे । म्हणोनि हैं उजेडे । सद्गुरुमुखें ॥ २२ ॥ इंद्रियाणां मनश्चास्मि । कृष्ण म्हणे मन तो मी । तरी कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥२३॥ ऐसें कृष्ण कां बोलिला । साध- नमार्ग दाखविला । खडे मांडूनि शिकविला । ओंनामा जेंवी ॥२४॥ ऐसा आहे वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद । देहबुद्धीचा विवाद । कामा न ये ॥२५॥ वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती । ते सर्वहि निवडती । सद्गु- रूचेनि वचनें ॥ २६ ॥ वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रं तोडीं ऐसा कोण । हैं निवडेना साधूविण । कदा कल्पांतीं ॥ २७ ॥ पूर्वपक्ष आणि सिद्धांत । शास्त्रीं बोलिला संकेतें । याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८ ॥ येन्हवीं वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें । बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रं ॥२९॥ म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद । तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें ॥ ३० ॥ एके कल्पनेचि पोटीं । होती जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची गोष्टी । साच केंवी ॥ ३१ ॥ कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढभाव । देवालागीं येता खेंव । भक्त दुःखें दुखावला ॥ ३२ ॥ पाषाणाचा देव केला । एके दिवशीं भंगोनि गेला । तेणें भक्त दुखावला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥ देव हरपला घरचे घरीं । एक देव नेला चोरीं । एक देव दुराचारीं । फोडिला बळें ॥ ३४ ॥ एक देव झापाणिला । एक देव उदकीं टाकिला । एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५ ॥ काय सांगों तीर्थमहिमा । मोडोनि गेला दुरात्मा । थोर सत्व होतें तें माँ । काय जाहलें कळेना ॥ ३६ ॥ देव घडिला सोनारीं । देव वोतिला वोतारीं । एक देव घडिला पार्थरीं । पाषाणाचा ॥ ३७ ॥ नर्मदा गंडिका तीरीं । देव पडिले लक्षवरी । त्यांची १. लहर. २. निरनिराळे निर्णय. ३. अभिप्राय. ४. सरळ भाषण. ५. धोका. ६. फेंकून दिला. ७. मग. ८. पाथरवटांनीं.