दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 177, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४२ श्रीदासबोध. [ दशक संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥ चक्रतीर्थीं चक्रांकित । देव असती असंख्यात । नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९ ॥ बाण तां- दळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें । ऐसे देव कोण जाणे । खरे कीं खोटे ॥ ४० ॥ देव रेशिमाचा केला । तोहि तुटोनिया गेला । आतां नव नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१ ॥ आमचा देव बहु सत्य । आह्मांस आक्रांतीं पावत । पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२ ॥ आतां याचें सत्व गेलें । प्राप्त होतें तें झालें । प्राक्तन न वचे पालटिलें । ईश्वराचेनीं ॥ ४३ ॥ धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४ ॥ हे आपुलाली कल्पना । प्राक्तनाऐसीं फळें जाणा । परी त्या देवाचिया खुणा । वेगळयाचि ॥ ४५ ॥ श्लोक ॥ नानाशास्त्रविदो लोका नाना- दैवतपूजकाः ॥ आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १ ॥ म्हणोनि हें मायाभ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें । वेद शास्त्र पुराणें । ऐसेंचि बोलती ॥ ४६ ॥ साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाच अनुभव । पंचभूतातीत देव । सृष्टि मिथ्या ॥ ४७ ॥ सृष्टीपूर्वी सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां । शा- श्वत देव तत्वतां । आदि अंतीं ॥ ४८ ॥ ऐसा सर्वांचा निश्चय । यदर्थी नाहीं सं- शय । व्यतिरेक आणि अन्वय । कल्पनारूप ॥ ४९ ॥ एके कल्पनेचे पोर्टी । बोलिजेती अष्ट सृष्टी । तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५० ॥ एक कल्पनेची सृष्टी । दुसरी शाब्दिकें सृष्टी । तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१ ॥ चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वममृष्टी । सहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ॥ ५२ ॥ आठवी दृष्टिबंधनें । ऐशा अष्ट सृष्टी जाण । यांमध्यें श्रेष्ठ कोण । कोण सत्य मानावी ॥ ५३ ॥ म्हणोनि सृष्टी नाशवंत । जाणती संत महंत । सगुण भजावें निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४ ॥ सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासार विचारें । संतसंगें ॥ ५५ ॥ आतां असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त । येरवीं चित्त दुश्चित्त । संशयीं पडे १. गोमती नदींत. २. सर्व प्रकारं. ३. हें ब्रह्म नव्हे, तें ब्रह्म नव्हे, हा विचार. ४. हें ब्रह्म होय, तें ब्रह्म होय, हा विचार. ५. शब्दात्मक व्यवहार. ६. चित्रांतील व्यवहार. ७. स्वप्नांतील व्यवहार. ८. आकाशांत भासणारे अनेक आकार. ९. ज्वरानें बेशुद्ध जाल्यास भासणारे देखावे. १०. नजरबंदीचे खेळ.