भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 178, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 178

६ वा. ] सगुणभजन. १४३ ॥ ५६ ॥ तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टि मिथ्या ऐसें कळलें । परी हैं दृश्य अवघें नैाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७ ॥ दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि सत्यचि वाटतें । यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८ ॥ याचें प्रत्यु- त्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें । श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥ ऐवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोन रक्षावें सगुण । ऐसी हे अनुभवाची खूण । अनुभवी जाणती ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सृष्टिकथननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. सगुणभजन. श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन केलें । तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १ ॥ ज्ञानाहून थोर असेना । तरी कां पाहिजे उपासना । उपासनेनें जना । काय प्राप्त ॥ २ ॥ मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण । मज निरूपावा ॥ ३ ॥ जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त । सत्य सांडून असत्य । कोण भजावें ॥ ४ ॥ असत्याचा प्रत्यय आला । तरी मग नेम कां लागला । सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५ ॥ निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो । सगुण काय देऊं पाहतो । सांगा स्वामी ॥ ६ ॥ सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें म्हणतां । तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७ ॥ स्वामीचे भिडेनें बोलवेना । येहवीं कांहींच मानेना । साध्यचि झालिया साधना । कां प्रव- र्तावॆं ॥ ८ ॥ ऐसें श्रोत्याचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें । याचें उत्तर ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९ ॥ गुरूचें वचन प्रतिपाळण । हें मुख्य परमार्थांचें लक्षण । वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १० ॥ म्हणोनि आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें । श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें ॥ ११ ॥ काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार । किंवा प्रार- ब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२ ॥ होणार हैं तों पालटेना । भजनें काय करावें जना । हैं तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३ ॥ स्वामीची १. नसलें. २. एकंदरीत. ३. गोंधळून जाऊन.