दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 179, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४४ श्रीदासबोध. [ दशक
आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण । परंतु याचा काय गुण । मज निरू- पावा ॥ १४ ॥ वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाचीं लक्षणें । तुज कांहीं लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५ ॥ करणें लागे भोजन । करणें लागे उदक- प्राशन । मळमूत्रत्याग लक्षण । तेंहि सुटेना ॥ १६ ॥ जनाचें समाधान राखावें । आपुलें पोरिखें १ वोळखावें । आणि भजनचि मोडावें । हें कोण ज्ञान ॥ १७ ॥ ज्ञानें विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८ ॥ साहेबास लोटांगणीं जावें । नीचासारखें व्हावें । आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९ ॥ हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तूं एक मानवी रंक । भजसि ना तरी काय गेलें ॥ २० ॥ आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ । जो समर्थांचाहि समर्थ । देवां सोडविता ॥ २१ ॥ त्याचे आम्ही सेवकजन । सेवा करितां झालें ज्ञान । तेथें अभावें २ धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२ ॥ गुरु सांगता सारासार । त्यास कैसें म्हणावें असार । तुज काय सांगणें विचार । शाहणे जाणती ॥ २३ ॥ समर्थांचे मनींचें तुटे ३ । तेंचि जाणावें अदृष्ट ४ खोटें । राज्यपदापासुनि करंटे । चेंवलें ५ जैसें ॥ २४ ॥ मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी । विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५ ॥ वस्तुभजन ६ करीना । ना न करी एसेंहि म्हणेना । तरी हे जाणावी कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥ ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान । येथें नाहीं कीं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ २७ ॥ तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें । तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥ २८ ॥ करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार । ऐसा हा तों चमत्कार । रोकडा चाले ॥ २९ ॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि जातें । कृपा केलिया रघुनाथें । प्रतीत येते ॥ ३० ॥ रघुनाथभजनें ज्ञान झालें । रघुनाथभजनें महत्व वाढलें । म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१ ॥ हें तों आहे सप्रतीत । आणि तुज वाटेना प्रतीत । साक्षात्कारें नेमस्त । प्रत्यय करावा ॥ ३२ ॥ रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धि पावे । १. दुसऱ्याचें. २. अविश्वास. ३. मनांतून उतरणें. ४. दैव. ५. भ्रष्ट झालें. ६. ब्रह्माचें ध्यान, किंवा देवाचें भजन.