दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 180, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें६ वा. ] दृश्यनिरसन. १४५ कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३ ॥ कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुण निवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होईजे ॥ ३४ ॥ मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा । प्रतीत पाहसी तरी आतां । शीघ्रचि आहे ॥ ३५ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी । राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६ ॥ एके भावने- साठीं । देवासि पडे तुटी । कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ता भावितां ॥ ३७ ॥ आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुता काळांचा । आपण थोडे वोळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८ ॥ याकारणें रघुनाथ- भजन । त्यासि मानिती बहुत जन । ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं तत्पर ॥ ३९ ॥ ज्ञानबळें उपासना । आम्हीं भक्त जरी मानूं ना । तरी या दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४० ॥ देव उपेक्षी थोरपणें । तरी मग त्याचें तोचि जाणे । अप्रमाण तें श्लाघ्येंवाणें १। नव्हेचि कीं श्रेष्ठा ॥ ४१ ॥ देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना । ऐसी स्थिति सज्जना- । अंतरींची ॥ ४२ ॥ सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें कळों येतें । दृश्य ज्ञानियांचेनि मतें । स्वप्न जैसें ॥ ४३ ॥ मिथ्या स्वप्नविवंच- ना । तैसी हे सृष्टिरचना । दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४ ॥ आक्षेप झाला श्रोत्यांसी । मिथ्या तरी कां दिसतंतें आम्हांसी । याचें उत्तर पुढिले समासीं । बोलिलें असे ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. दृश्यनिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें । त्याचें उत्तर बोलिजेलें । तें सावध ऐका ॥ १ ॥ देखिलें तें सत्याचि मानावें । हें झाल्याचें देखणें नव्हे । जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २ ॥ एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी २ । संत महंतांच्या गोष्टी । त्याहि मिथ्या मानाव्या ॥ ३ ॥ माझें दिसतें हेंच खरें । तेथें चालेना दुसरें । ऐशिया संशयाच्या भरें । भराँचि नये ॥ ४ ॥ मृगें देखिलें मृगजळ ३। १. भूषण. २. असंख्य ग्रंथ. ३. प्रखर उन्हांत अरण्यांत पाण्याचा भास होतो तो.