दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 182, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें६ वा. ] दृश्यनिरसन. १४७ २२ ॥ ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे । परी हें सत्य म्हणोन कैसें । विश्वासावें ॥ २३ ॥ माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचियेपरी । परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४ ॥ लटिकें साचाऐसें भावावें । तरी मग पारखी कासया असावें । एवं ये अविद्येचे गोवे । ऐसेचि असती ॥ २५ ॥ मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी । शेवट पाहतां निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६ ॥ तैशीच माव राक्षसांची । देवांसहि वाटे साची । पंचवटिकेसी मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७ ॥ पूर्वकाया पाल- टिती । एकाचेचि बहुत होती । रक्तबिंदीं जन्मती । रजनीचरें ॥ २८ ॥ नानापदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले । कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरूपी ॥ २९ ॥ कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें । काळनेमी- च्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३० ॥ नाना दैत्य कपटमती । जे देवां- सहि नाटोपती । मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१ ॥ ऐसी राक्षसांची माव । जाणों न शकती देव । कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें ॥ ३२ ॥ मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी । भगवंताची नाना- परी । विचित्र माया ॥ ३३ ॥ हे साचासारिखीच दिसे । विचारितांचि निरसे । मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४ ॥ साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे । दोहीं पदार्थां अविश्वासे । सांगतां मन ॥ ३५ ॥ परंतु हे नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार । दिसतँ हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६ ॥ तथापि अजून तुजला । भासचि सत्य वाटला । तरी येथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७ ॥ दृश्य भास अवि- द्यात्मक । तुझाही देह तदात्मक । म्हणोनि हा अविवेक । तेथें संचरला ॥ ३८ ॥ दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावारि बैसलें । तरी तें लिंगदेह झालें । अविद्यात्मक ॥ ३९ ॥ अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वा- सली । तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४० ॥ तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण । येणें करितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥ १. गारुड. २. प्रत्येक रक्तबिंदूपासून अनेक दैत्य उत्पन्न झाले. (सप्तशती पहा.) ३. राक्षस. ४. खोटें. ५. कालनेमी राक्षस ऋषीचें सोंग घेऊन कपटानें आश्रम स्थापून होता, त्या प्रकाराचें. (रामायण पहा.). ६. चमत्कार. ७. माया.