दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 185, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपूजा प्रत्यक्ष दर्शन । यांस महदंतर ॥ २६ ॥ पुढें जन्मांतरीं होणार । हा तों अवघाच उधार । तैसें नव्हे सारासार । तात्काळ लाभे ॥ २७ ॥ तात्काळाचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो । संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणांचा ॥ २८ ॥ याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें । मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारणें ॥ २९ ॥ ये गोष्टीस करी अनुमान । तो शीघ्राचि पावेल पतन । मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३० ॥ हैं यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्राचि मुक्त होणें । असोनि कांहींच नसणें । जनांमध्यें ॥ ३१ ॥ देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण । हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२ ॥ देहींच विदेहें होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३ ॥ येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे । संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरु- वचनें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सारशोधन- निरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. अनिर्वाच्यनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं । तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १ ॥ मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्राय मजला । निरूपण कीजे ॥ २ ॥ अनुभवहि पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां । तरी कोणापा- शीं पुसों आतां । समाधान ॥ ३ ॥ जे ते अगम्य सांगती । न ये माझिये प्रचीती । विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४ ॥ ऐसें श्रोत्याचें उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर । निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५ ॥ जें समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ । तेंचि स्वरूप प्रांजळ । बोलून दावूं ॥ ६ ॥ जें बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना । ज- यास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७ ॥ तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम । धरितां संतसमागम । सर्वहि कळे ॥ ८ ॥ तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल । ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तू १. देहरहित. २. बोलून दाखविण्यास अशक्य.