दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 199, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६४ श्रीदासबोध. [ दशक काश ॥ २१ ॥ खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ कालिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥ म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आढळ परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा । परंतु ते स्थिरावेना । वायूऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया मायिक । शाश्वत तें ब्रम्ह एक । पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६ ॥ पृथ्वीसि भेदूनि राहे । परी तें ब्रम्ह कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७ ॥ पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ¹ । अनळाहूनि कोमल । वायु जाणावा ॥ २८ ॥ वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण । गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रम्ह जाणावें ॥ २९ ॥ वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें । उपमेरहित संचिलें । कठीण ना मृदु ॥ ३० ॥ पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥ तेजीं असे परी जळेना । पवनें² असे परी चलेना । गगनीं असे परी ढळेना । परब्रम्ह तें ॥ ३२ ॥ शरीरीं अवघें व्यापिलें । परी तें नाहीं आढळलें । जवळींच दुरा- वलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें राहणें घडे । बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥ तयामध्येंच आपण । सै- बाह्य³ तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंच तें कोंदाटलें । जैसें न दिसे आपुलें । आपणासि धन ॥ ३६ ॥ जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे । अनुभवें हें कुवांडें⁴ । उकलावें ॥ ३७ ॥ मागें पुढें आकाश । पदार्थैविण जो पैस⁵ । पृथ्वीविण भकांस⁶ । एकरूप ॥ ३८ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो नौथि- लाचि⁷ भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९ ॥ नभीं धू- म्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबरें⁸ । माया देवी ॥ ४० ॥ ऐशी माया अशाश्वत । ब्रम्ह जाणावें शाश्वत । सर्वांठायीं सदोदित । भ- रलें असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमध्यें९ भरलें आहे । : १. अग्नि. २. वायूमध्यें. ३. आंत बाहेर. ४. कोंडें ५. अवकाश. ६. ओसाड. ७. नसलेला. ८. गारुड. ९ अक्षरांमध्ये.