दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 200, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा. ] द्वैतकल्पनानिरसन. १६५ नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२ ॥ श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां । मना सबाह्य तत्वतां । परब्रम्ह तें ॥ ४३ ॥ चरणें चालतां मार्गीं । जें आढळेल सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रम्ह ॥ ४४ ॥ असो इं- द्रियसमुदाय । तयामध्यें वर्तें सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥ जें जवळींच असे । पाहों जातां न दिसे । न दिसोन बैसे । कांहीं एक ॥ ४६ ॥ जें अनुभवेंच जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रम्ह ॥ ४७ ॥ ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे । अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया । ते एक जाणावी तुर्या । सर्वसाक्षणी ॥ ४९ ॥ साक्षित्व वृत्तीचें कारण । उन्मनीं ते निवृत्ती जाण । तेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥ जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रम्हीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रम्ह शाश्वत । जेथें कल्पनेसि अंत । योगिजनांचा एकांत । अनुभवें जाणावें ॥ ५२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम- दशके विमलब्रम्हनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. द्वैतकल्पनानिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ केवळ ब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें । आणि मायेचें लागलें । अनुसंधान ॥ १ ॥ ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मा- याही प्रत्यक्ष दिसे । आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २ ॥ तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन । माया ब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३ ॥ सत्य ब्रम्हाचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प । ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । ते एक जाणावी तुर्या । सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५ ॥ ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाण- पण । सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६ ॥ संकल्पविकल्पांची सृष्टी । झाली मनाचिये पोटीं । तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवण ॥ ७ ॥ साक्षित्व चतन्य सत्ता । हे गुण ब्रम्हाचिया माथां । आरोपिले जाण वृथा । मायागुणें १. दिसत नाहीं पण आहे. २. डोळ्यानें. ३. मनाच्या लयाची अवस्था. ४. तर्क. ५. सविकल्प समाधि.